Close Visit Mhshetkari

Caste Validity Certificate: फक्त 8 दिवसात काढता येणार जात वैधता प्रमाणपत्र, पहा कोणते कागदपत्र लागतील व कोठे करावा अर्ज

Caste Validity Certificate : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की जात वैधता प्रमाणपत्र हा भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरदारांसाठी महत्त्वाचा विषय असतो. 

नोकरीला लागण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र हे सर्वात महत्त्वाचे आणि अंतिम प्रमाणपत्र असते हे काढण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते आणि वेगवेगळ्या कागदपत्रांची सुद्धा आवश्यकता असते. प्रमाणपत्र कसे करायचे? कागदपत्र, वेबसाईट याची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत . 

सरकारने विद्यार्थ्यांची धावपळ कमी करण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळे जीआर आणि परिपत्रक निर्गमित केलेले आहेत शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जाड पडताळणी समिती करून अर्ज केल्यानंतर फक्त आठ दिवसात कास्ट व्हॅलेडीटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र मिळणार आहे तर त्याची प्रोसेस कशी आहे याविषयी पाहूया.

Caste Validity Certificate

मित्रांनो जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला अधिकृत वेबसाईट वरती अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी शाळेचा पुरावा असणे आवश्यक आहे. नसल्यास उत्पन्नाचा दाखला देखील तुम्ही जोडू शकता.

साधारणपणे कास्ट व्हॅलिटी काढण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागतो, परंतु शासनाने शिक्षक विद्यार्थ्यांची मुस्कान होऊ नये, म्हणून यासाठी फक्त आठ ते दहा दिवसाचा कालावधी निश्चित केलेला असून विद्यार्थ्यांना त्या कालावधीत जात वैधता पडताळणी समिती करून पडताळणी होऊन प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

Caste Validity Certificate documents

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  • तुमच्या महाविद्यालयाचे पत्र आणि चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड
  • विद्यार्थ्यांच्या शाळा सोडण्याचा दाखला आणि बहिणीचा निर्गम उतारा
  • महाविद्यालयाच्या प्राचार्याचे स्वाक्षरी आणि विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो
  • विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स
  • विद्यार्थ्यांच्या वडिलांचा शाळेचा दाखला, पहिलीचा आणि जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स, व त्याचबरोबर वडील जर अशिक्षित असेल तर त्याचे शपथपत्र
  • विद्यार्थ्यांच्या आत्या चुलते यांच्या शाळा सोडल्याचा दाखला

जात वैधता महसुली पुरावे

  • महसुली पुरावे: (गाव न.सात टॅक्स पावती, खरेदीखत सहा- ड, फेरफार उतारा, गहाणखत, मालमत्ता पत्रक)
  • वंशावळ नमुना नं. 3 कोऱ्या कागदावर शपथपत्र व फॉर्म नं.17 (शपथ पत्र).
  • जात संवर्गा निहाय जात पडताळणीसाठी लागणारे पुरावे खालील प्रमाणे
  • SC : वर्गातील विद्यार्थ्यांनी 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा पुरावा जोडणे.
  • VJNT: वर्गातील विद्यार्थ्यांनी 21 नोव्हेंबर 1961 पूर्वीचा पुरावा जोडणे.
  • OBC आणि SBC: वर्गातील विद्यार्थ्यांनी 13 ऑक्टोबर 19 67 पूर्वीचा पुरावा जोडणे.

जात वैधता प्रमाणपत्र साठी येथे अर्ज करा

Caste validity

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment