Bank New update : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक अत्यंत आणि महत्वाची बातमी आहे. आताच्या काळामध्ये आर्थिक व्यवहार ऑनलाइन होताना आपल्याला दिसत आहे बहुतांश लोक पैसे ट्रान्सफर करताना ऑनलाईन करतात कॅशलेस व्यवहाराला सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलेले आहे त्यामुळे आता आणखी वाढ झाली.
RBI Bank new update
फोन पें, गुगल पें इत्यादी अँप्लिकेशनने पेमेंट करण्यास प्राधान्य दिले जात आहे. जरी तुम्ही जरी ऑनलाइन पेमेंट करत असला तरी चेकची व्हॅल्यू आजही कायम आहे चे महत्व कायम टिकून आहे
तुम्हाला माहिती असेलच की आज देखील पैशाचे व्यवहार करताना धनादेशचा वापर केला जातो अनेक ठिकाणी चेक द्वारेच पैसे देवाणघेवाण करावे लागतात अशा वेळेस तुमचा जर चेक बाउन्स झाला तर तुम्हाला किती दंड भरावा लागेल व काय उपाययोजना करावे लागेल. हा प्रश्न सर्वांनाच उपस्थित होतोया प्रश्नाचे उत्तर आपण पाहणार आहोत
RBI चा नियम काय सांगतो
- तुम्हाला माहिती असेलच की ज्यावेळेस चेक बाउन्स होतो त्यावेळेस बँक आपल्याला दंड आकारत असते.
- चेक पाऊस झाल्यानंतर प्रत्येक बँकेचा वेगवेगळा दंड असतो.
- तुमचा चेक बाउन्स झाल्यास तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते.
- चेक बाउन्स होण्यामागे काय कारणे आहेत अशा वेळेस तुम्हाला किती दंड आकारला जाईल आणि तुमच्यावर कारवाई केव्हा होते .याविषयी माहिती पहा
किती दंड आकारला जाईल?
- चेक बाउन्स झाल्यानंतर दंड ज्या व्यक्तीने चेक जारी केला आहे त्या व्यक्तीला भरावा लागणार हा दंड तुमच्या कारणांनुसार बदलू शकतो.
- तुम्हाला साधारणपणे 150 ते 750 किंवा 800 रुपये पर्यंत तुमच्यावर दंड आकारण्यात येऊ शकतो
- भारतामध्ये चेक बाउन्स हा एक गुन्हा मानला जातो.
- चेक बाऊन्स्ड नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट, 1881 नुसार चेक बाऊन्स झाल्यास एखाद्या व्यक्तीवर कारवाई केली जाऊ शकते.
- त्या व्यक्तीला दोन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा चेकच्या दुप्पट रकमेचा दंड आकारण्यात येते.
- शक्यतो हे तेव्हाच घडते जेव्हा चेक देणाऱ्याच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसते आणि बँक चेकचा अनादर करते.