Close Visit Mhshetkari

Bank loan : मोठी बातमी … नवीन वर्षाच्या सुरवातीलाच बँकांकडून व्याजदरात वाढ ! पहा लेटेस्ट इंटरेस्ट रेट्स …

Bank Loan : नमस्कार मित्रांनो नवीन वर्ष सुरू होता आज अनेक बँकांनी कर्मचाऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांना मोठा धक्का दिला आहे.किरकोळ कर्जावरील जसे की पर्सनल लोन ऑटो लोन होम लोन यांच्यावर व्याज दरात वाढ करण्यात आली आहे.

बँक कर्ज दरात वाढ?

बँक कर्ज व्याजदर वाढवण्याचा गृह कर्जावर परिणाम होणार नसला तरी, रिपोर्ट दरात बदल झाल्यानंतर बँका मार्जिनल कास्ट लेंडिंग रेट वाढवतात पण यावेळी तसे झालेले नाही.

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की फेब्रुवारी 2023 पासून रिझर्व बँक ऑफ इंडिया ने रिपोर्ट दरात कोणताही बदल केलेला नाही.ज्या बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI चा सुद्धा समावेश आहे.

Car Loan Interest Rate

SBI Bank : स्टेट बँक ऑफ इंडिया करून चांगला सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांना वाहन कर्जावरती 8.85% दराने व्याजदर दिला जात आहे यापूर्वी हा व्याजदर 8.65% होता.

बँक ऑफ बडोदा :- या बँकेचा व्याजदराचा विचार करायचा झाल्यास बँकेकडून वाहन कर्जाचा व्याजदर 8.7% होता आता बँकेकडून यामध्ये वाढ करण्यात आली असून आता 8.8% दराने कर्जपुरवठा करण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात बँकेकडून प्रोसेसिंग फी घेतली जात नव्हती, पण आता बँकेकडून आता प्रोसेसिंग फीही आकारली जात आहे.

हे पण पहा --  Bank loan : 'या' सरकारी बँकांनी दिला ग्राहकांना झटका, कर्ज महागले; पहा किती होणार खिशावर परिणाम ..

युनियन बँके :- याचे वाहन कर्जाचे सध्याचे दर 9.15 टक्के असून यापूर्वी 8.75 टक्के दराने वाहन कर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते.

आयडीएफसीने फर्स्ट बँक :- बँकेने पर्सनल लोनवरील व्याजदर 10.49 टक्क्यांवरून 10.75 टक्क्यांवर नेला आहे.

कर्नाटक बँके : सदरील बँकेने आपले व्याजदर जसे की, पर्सनल लोन 14.28% केले आहेत यापूर्वी वैयक्तिक कर्ज 14.21 टक्के दराने देण्यात येत होते.

बँक ऑफ महाराष्ट्र : – बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे बँकेने होम लोन च्या दरात कपात केली,असून गृह कर्ज 8.5% वरून 8.35 टक्क्यापर्यंत कमी केले आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment