Close Visit Mhshetkari

ATM Cash Withdrawal : एटीएम मधून फाटकी नोट निघाल्यास काय करावं ? फाटलेली नोट बदलून मिळते का ? पहा सविस्तर

ATM Cash Withdrawal : एटीएम कार्डधारकांसाठी आजची बातमी खूपच खास ठरणार आहे. खरंतर अलीकडे पैशांचे व्यवहार ऑनलाइन झाले आहेत.यूपीआयमुळे पैशांचे व्यवहार आधीच्या तुलनेत खूपच सोपे झाले आहेत.

कॅशने पैशांचे व्यवहार करण्याऐवजी अनेकजण UPI अँप्लिकेशनने कॅशलेस व्यवहार करण्याला अधिक पसंती दाखवत आहे. मात्र असे असले तरी आजही असे अनेक जण आहेत ज्यांना ऑनलाइन व्यवहार करणे आवडत नाही.

मित्रांनो आज सुद्धा भारतात मोठ्या प्रमाणावर कॅश व्यवहार केले जातात. अशा परिस्थितीत बँकेत न जाता लोक सरळ एटीएम मधून पैसे काढणारा पसंती देतात.मात्र अनेकदा एटीएम मशीन मधून कॅश काढतांना फाटलेली नोट मिळते.
How to Replace A torn Note

आपल्याला एटीएम मधून फाटलेली नोट मिळाल्यावर मोठी चिडचिड होते यामुळे आपले पैसे वाया जाईल असे आपल्याला वाटते आपल्या सोबत सुद्धा असे अनेक वेळा घडले असेल तर एटीएम मधून फाटलेली नोट बदलता येते का तर याचे उत्तर आहे मित्रांनो होय. तर मग चिंता करू नका आज आपण एटीएम मधून फाटलेली नोट मिळाल्यास काय केले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

सर्वप्रथम, एटीएम मशीनवर असलेल्या “कॅमेऱ्यात नोट दाखवा” या सूचनांचे पालन करा. यामुळे तुमच्या व्यवहाराचा पुरावा मिळेल.तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करा आणि एटीएम मधून फाटक्या नोटा मिळाल्याची तक्रार नोंदवा. तक्रार नोंदवताना तुम्हाला तुमच्या एटीएम व्यवहाराचा तपशील आणि फाटक्या नोटेची क्रमांक द्यावी लागेल.तुम्ही बँकेच्या शाखेतही जाऊन तक्रार नोंदवू शकता.

हे पण पहा --  ATM Withdrawal Limit : आता SBI,HDFC,PNB आणि ICICI बँकेच्या एटीएममधून एका दिवसात किती कॅश विथड्रॉल करू शकता ? जाणून घ्या नवीन मर्यादा ...

फाटलेल्या नोटा कशा बदलाव्यात?

बँकेकडून तुमची तक्रार नोंदवली गेल्यानंतर,तुम्हाला तुमच्या फाटक्या नोटा बदला मिळतील.
50% पेक्षा जास्त नोट शिल्लक असल्यास अशा परिस्थितीत तुम्हाला पूर्ण रक्कम मिळेल.
40% ते 50% नोट शिल्लक असल्यास तुम्हाला नोटेची 50% रक्कम मिळते.
40% पेक्षा कमी नोट शिल्लक असल्यास बँक तुमची नोट स्वीकारण्यास नकार देऊ शकते.
काही बँकांमध्ये “फाटक्या नोटा स्वीकारण्याची मशीन” असते. तुम्ही तुमच्या फाटक्या नोटा या मशीनमध्ये टाकून त्या बदल्यात नवीन नोटा मिळवू शकता.
फाटक्या नोटा लवकर बदला. जितका जास्त विलंब, तितकी तुमची नोट स्वीकारण्यास बँक नकार देण्याची शक्यता जास्त.

तुमच्याकडे नोंदणी केलेली तक्रारीची आणि फाटक्या नोटांची पुष्टी करणारी कागदपत्रे जपून ठेवा.जर तुम्हाला बँकेकडून योग्य प्रतिसाद मिळत नसेल तर तुम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेकडे तक्रार दाखल करू शकता.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment