Close Visit Mhshetkari

Aadhar Card News  : तुमच्या आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ? हे ऑनलाइन कसे तपासायचे..

Aadhar Card news : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर घेऊन आलो आहे. आधार कार्ड ला आपण एक ओळखीचा पुरावा म्हणून ओळखतो देशाच्या 90% होऊन अधिक लोकांकडे आधार कार्ड आहे. भारतामध्ये आपल्याला प्रत्येक कामासाठी आधार कार्ड ची गरज भासते असे आपण म्हणू शकतो. कोणते शासकीय काम असो किंवा अनिमशासकीय यासाठी आपल्याला आधार कार्ड ची गरज असते.

Aadhar Card number linking

आपल्याला एखादा सिम कार्ड जरी घ्यायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला आधार कार्ड ची गरज भासते शाळेत ऍडमिशन घेण्यापासून तर मतदान कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड काढण्यासाठी व शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी बँक अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला विविध कामासाठी आधार कार्डचा उपयोग होतो.

तसेच तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरिता आधार कार्डची आवश्यकता असते. आधार कार्डचा उपयोग करून तुम्ही पैसे देखील काढू शकता. यावरूनच आधार कार्ड ला किती महत्त्व आहे. हे आपल्या लक्षात येते. परंतु बऱ्याच जणांना आपल्या आधार कार्डशी कोणता नंबर लिंक केला आहे. हे आठवत नाही किंवा माहिती नसते. तर अशावेळी आपल्या आधार कार्डशी कोणता नंबर लिंक केला आहे. हे कसे पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या लेखांमध्ये पाहणार आहोत.

हे पण पहा --  Fake Aadhaar Card : तुमच्याकडेही असू शकते बनावट आधार कार्ड, क्यूआर कोड व नावाद्वारे असे ओळखा ...

How to check which mobile number is linked to your Aadhaar card online

  1. तुम्हाला सर्वप्रथमUIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जावे लागेल .
  2. तुम्हाला सर्व पर्याय उपलब्ध होतील आणि त्या पर्यायांमध्ये आधारसेवयेचा विभाग मध्ये तुम्हाला व्हेरिफाय  ई-मेल व मोबाईल नंबरचा पर्याय दिसेल
  3. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. व क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला एक पेज दिसेल आणि तुमच्या आधार कार्डशी जो नंबर लिंक केला आहे. तो त्या पेज वरती तुम्हाला दिसेल .
  4. समोर जाऊन तुम्हाला व्हेरिफाय मोबाईल नंबर या पर्यायावर क्लिक करायचे आहे. 
  5. तुम्ही तुमच्याकडे जेवढे मोबाईल नंबर आहे ते तिथे वापरून नेमका कोणता मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक केला आहे. तुम्ही अशा रितीने तपासून शकता.

Leave a Comment