Close Visit Mhshetkari

Aadhaar Update: घरबसल्या तुमच्या आधारकार्डवरील पत्ता कसा दुरुस्त करायचा ? पहा संपूर्ण प्रक्रिया

Aadhaar Update:- नमस्कार मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाची कागदपत्र असल्याने अनेक शासकीय कामासाठी आणि बँकेतील कामासाठी आधार कार्ड लिंक करणे एवढेच नाही तर तुम्हाला सिम कार्ड जरी घ्यायचे असेल तर आधार कार्ड हे आवश्यक आहे.

आधार कार्ड पत्ता दुरुस्ती कसा दुरुस्त करावा?

आधार कार्ड हा खूपच महत्त्वाचे कागदपत्र असून या आधार कार्डवर जर थोडी जरी चूक असली तरी तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आधार कार्डच्या बाबतीत जर पाहिले तर आपल्याला काही गोष्टींनी आधार कार्ड अपडेट करण्याची गरज भासते. तसेच बरेच व्यक्ती कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे जातात किंवा एकाच शहरांमध्ये त्यांचा राहता पत्ता देखील बदलतात.

आधार कार्ड असल्यावर तुम्हाला कोणतेही व्यवहार करणे सोपे जाते. तुमच्या जर आधार कार्डवर एखादी चूक असेल किंवा तुम्हाला घराचा पत्ता बदल बदलायचा असेल तर आता ते तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने करता येणार आहे. तुम्ही तुमच्या घरी बसून तुमच्या आधार कार्ड वरील पत्ता बदलू शकता. म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या घराचा पत्ता अपडेट करू शकता

हे पण पहा --  Aadhar Card News  : तुमच्या आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ? हे ऑनलाइन कसे तपासायचे..

How to update Address on Aadhaar

  • तुम्हाला सगळ्यात आधी युआयडीएआयच्या myaadhar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  • लॉगिन करण्याकरता तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाकणे गरजेचे आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅपच्या कोड टाकावा व सेंड ओटीपी वर क्लिक करावे.
  • तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर एक हा आलेला ओटीपी नमूद करावा आणि लॉगिन करावे.
  • प्रोसीड टू आधार अपडेट या पर्यायावर क्लिक करावे.
  • तुमचा सध्याचा पत्ता तुमच्यासमोर येतो.
  • तुम्हाला अपडेट करायचा असलेल्या पत्त्याचा पर्याय समोर येतो.
  • तुम्हाला तुमचा नवीन पत्ता असलेले एखादे कागदपत्र सबमिट करावे लागेल.
  • आता खाली दोन चेक बॉक्स असतील त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल आणि नेक्स्ट वर क्लिक करावे लागेल.
  • नेट बँकिंग किंवा यूपीआय द्वारे पेमेंट करू शकतात.
  • पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल व त्यानंतर साधारणपणे सुमारे 30 दिवसात तुमच्याआधार कार्ड अपडेट होईल.

Leave a Comment