Close Visit Mhshetkari

Aadhaar Card : आपण आधार कार्डात किती वेळा बदलू शकतो आपले नाव, वय आणि पत्ता ? पहा सविस्तर माहिती ..

Aadhaar Card : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आधार कार्ड हा आजच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेला आहे.आजच्या काळात आर्थिक असुकी अन्य कोणते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड आवश्यक असते.

Aadhar Card new rules 2024

बँक खाते उघडण्यापासून सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आधार कार्ड आवश्यक असते.शालेय ऍडमिशन साठी सुद्धा आधार प्रमाणीकरण सरल प्रणालीच्या माध्यमातून अनिवार करण्यात आलेला आहे.

प्रत्येक गोष्टीसाठी आधार आवश्यक असल्याने आधार कार्ड असण्यासोबतच त्यावर नोंदवलेली तुमची माहिती सुद्धा पूर्णपणे बरोबर असणे आवश्यक असते.

Address and Name Update in Aadhaar

मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपल्या आधार कार्ड वरची डिटेल्स वेळोवेळी अपडेट करता येत असते.ज्यामध्ये आपले नाव,पत्ता,जन्मतारीख,लिंग,फोटो याचा सुद्धा समाविष्ट असतो. परंतु यासाठी सरकारने मर्यादा ही निश्चित करून दिलेली आहे.

भारतातील कोणत्याही नागरिकाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकदाच आधार क्रमांक जारी करण्यात येतो. ज्यामध्ये 12 अंकी विशिष्ट नंबर प्राधिकरणाद्वारे (UIDAI) जारी केलं जाते. आधार कार्डमध्ये १२-अंकी विशिष्ट क्रमांक असतो, ज्यावरून संबंधित नागरिकाची माहिती मिळते. यामध्ये पत्ता, पालकांचं नाव, वय यासह अनेक माहिती नोंदवली जाते.

देशातील कोणत्याही नागरिकाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकदाच आधार क्रमांक जारी केला जातो. हे आधार कार्ड भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) जारी केले जाते. 

  • UIDAI ने कोणत्याही आधार कार्ड धारकासाठी पत्ता बदलण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. 
  • UIDAI नुसारआधार डेटामध्ये तुम्ही तुमचे नाव वारंवार बदलू शकत नाही.एक आधार कार्ड धारक त्याच्या आधार डेटामध्ये त्याचे नाव आयुष्यात फक्त दोनदा बदलू शकतो. 
  • आधार कार्ड वरीलजन्मतारीख फक्त एकदाच आधारमध्ये बदलू शकता. 
  • तुम्ही आयुष्यात फक्त एकदाच आधारमध्ये लिंग माहिती बदल करू शकता.
हे पण पहा --  Blue aadhar card : म्हणजे काय? कोणासाठी असते हे निळे आधार कार्ड ? पहा सविस्तर माहिती

Online Aadhaar Card Update

आधार कार्डमध्ये नाव बदलण्यासाठी तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटचा वापर करू शकता किंवा आधार सेवा केंद्राला भेट देऊ शकता.

1. सर्वप्रथम UIDAI च्या https://myaadhaar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. “लॉगिन” वर क्लिक करा आणि तुमचा आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड टाका.

3. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला OTP टाका.

4. “माय आधार” टॅबवर क्लिक करा आणि “Update Demographic Data” पर्याय निवडा.

5. “नाव बदल” निवडा आणि आवश्यक ती माहिती द्या.

6. तुमची समर्थन करणारी कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.

7. सबमिट करा आणि OTP साठी विनंती करा.

8. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला OTP टाका.

9. तुमचा नाव बदलण्याचा अर्ज सबमिट केला जाईल.

ऑफलाइन आधार कार्ड अपडेट प्रक्रिया

1. जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्या.

2. “आधार दुरुस्ती/सुधारणा” फॉर्म (Aadhaar Correction/Update Form) भरा.

3. नावात बदल करण्यासाठी आवश्यक ती माहिती द्या.

4. तुमची समर्थन करणारी कागदपत्रे जमा करा.

5. आवश्यक शुल्क भरा.

6. तुमचा अर्ज सबमिट करा.

Leave a Comment