Close Visit Mhshetkari

ZP Teacher transfer | जिल्हा परिषद ऑनलाईन शिक्षक बदली अपडेट्स

Teacher transfer शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हान्तर्गत बदल्यासाठी सुधारीत धोरण दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी जाहीर केले असून त्याचा सारांश आणि बदल्याचे टप्पे थोडक्यात या लेखात आपण पाहणार आहोत.

Zp teacher transfer
Zp teacher transfer

जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रिया

जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षक संवर्गासाठी जिल्हांतर्गत बदल्यांचे सुधारित धोरण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

बदली अधिकार प्राप्त शिक्षक

बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे मरावयाची ल्यास सर्वसाधारण क्षेत्रात वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या अवघड क्षेत्रात १० वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल.

आपसी आंतरजिल्हा बदली शिक्षकांच्या बाबतीत आपसी बदली झालेल्या दोघांपैकी कनिष्ट शिक्षकांची सेवा धरली जाणार असून त्यांना जर १० वर्ष झाले असेल तर ते पण शिक्षक बदली प्राप्त होणार आहे. ( दि.28/1 / 2019 च्या शासन निर्णयान्वये )

शाळानिहाय रिक्त जागा घोषणा

    शाळानिहाय रिक्त जागा घोषित करण्यात येईल आणि त्यानंतर बदली पात्र व अपात्र सर्व शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करण्यात येईल.शिक्षणाधिकारी प्रथमतः प्रतिवर्षी बदलीस पात्र शिक्षकांच्या (सर्वसाधारण तसेच अवघड क्षेत्र) याद्या प्रसिध्द करतील.
तसेच विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करतील.

समानिकरणाने रिक्त ठेवायच्या जागा

   समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे भरती किंवा अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या समायोजनाद्वारे उपलब्ध झाल्याशिवाय समुपदेशनासाठी खुली करता येणार नाहीत.अशाप्रकारे शाळानिहाय ठेवावयाच्या रिक्त पदांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येईल.शिक्षकांच्या बदल्या करीत असताना समानीकरणांतर्गत रिक्त ठेवाव्या लागणाऱ्या जागेवर बदली करण्यात येणार नाही.’जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रिया’

ऑनलाईन शिक्षक बदली

बदली टप्पा क्रमांक एक

विशेष संवर्ग 1 ची बदली विशेष संवर्ग 1 ची बदली प्रक्रिया राबविताना समानीकरना अंतर्गत ठेवलेली रिक्त पदे वगळून, निव्वळ रिक्त पदे आणी बदलीस पात्र शिक्षकांची जागा यांची रिक्त जागा म्हणून यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर संवर्ग 1 च्या बदली हवी असणाऱ्या शिक्षकांना 30 जागेच्या पसंतीक्रमासह फॉर्म भरण्यासाठी 4 दिवसाचा कालावधी असेल. संवर्ग 1 चा शिक्षक हा बदलीसपात्र शिक्षक असेल तर त्याना बदलीसाठी फॉर्म भरणे आवश्यक असेल (नकार देण्याचा अधिकार आहे). बदलीस पात्र नसेल आणी बदली नको असेल तर फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. संवर्ग 1 च्या अनेक शिक्षकांचा बदली साठीचा पसंतीक्रम सारखाच असेल तर सेवाज्येष्ट शिक्षकांना त्या जागेसाठी प्राधान्य राहील,आणी सेवाज्येष्टता समान असेल तर वयाने ज्येष्ठ असणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य राहील. त्यामुळे पसंतीक्रम काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. पसंतीक्रमनूसार शाळा देता आली नाही तर बदली होणार नाही. सदर सुधारित धोरणानुसार संवर्ग 1 च्या शिक्षकांनी एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर पुढील 3 वर्ष बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.

बदली टप्पा क्रमांक दोन

विशेष संवर्ग शिक्षक भाग २ मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदलीस पात्र यादीत नाव असल्यास,त्यांनी सोबतच्या विवरणपत्रात नमूद केलेप्रमाणे अर्ज करावा.विशेष संवर्ग शिक्षक भाग २ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम देताना जोडीदाराच्या शाळेपासूनच्या ३० कि.मी. अंतरातील अथवा त्या तालुक्यात असलेल्या शाळांचा पसंतीक्रम द्यावा.
बदलीस पात्र शिक्षकांनी उपरोक्त नमूद केलेप्रमाणे पसंतीक्रम न दिल्यास किंवा त्यांना त्यांचे पसंतीप्रमाणे बदली देणे शक्य नसल्यास त्यांची बदली उपलब्ध असणाऱ्या पदावर करण्यात येईल.

बदली टप्पा क्रमांक तीन 

      या टप्प्यात अवघड क्षेत्रातील बदली अधिकार प्राप्त शिक्षकाचा सामावेश होईल. संवर्ग 2 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुधारीत रिक्त जागेची यादी जाहीर करण्यात येईल त्यानंतर अवघड क्षेत्रात (अवघड क्षेत्र जिल्हासमिती जाहीर करेल) किमान 3 वर्षाची सेवा झालेले बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना उपलब्ध असणाऱ्या जागेच्या पसंतीक्रमसह फॉर्म भरण्यासाठी 4 दिवसाचा कालावधी असेल.

ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची ३ वर्षाची बदली करावयाची निश्चित धरावयाची अवघड क्षेत्रातील सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र- १ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
सदर कर्मचाऱ्याच्या बदल्या ह्या त्यांच्या बदल्यासाठी पात्र धरावयाच्या सेवा ज्येष्ठतेनुसार करण्यात येतील.सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने जेष्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील.बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही.

बदली टप्पा क्रमांक चार

संवर्ग 1,2,3 साठी केलेल्या कार्यपध्दतीमुळे,बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठतायादी जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधि देण्यात येईल. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचान्यास बदली प्राधान्याने अनुज्ञेय राहील.
या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राध्यान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील.परंतु ह्या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवावयाच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील,त्याच रिक्त पदांवर बदली होऊ शकते.या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यासउपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.सर्व बदली पात्र शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ४ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.

बदली टप्पा क्रमांक पाच

     विस्थापित आणि प्राधान्यक्रम न भरलेल्या शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा असेल.संवर्ग चार पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व संवर्ग चार मधून उरलेल्या ( विस्थापित ) शिक्षकांना त्यांना पसंतीक्रमामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येईल.संवर्ग चार नुसार सर्वांची सेवाज्येष्ठता व पसंतीक्रमानुसार बदली करण्यात यावी.

      सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा संवर्ग चार ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.

सारांश –

  सर्व प्रथम जिल्ह्यातील सर्व कार्यरत शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी लावली जाईल. ज्या बदली पात्र व बदली अपात्र उल्लेख असेल.

बदली साठी एका शाळेवर 5 वर्ष आणि जिल्हयांत 10 वर्ष झालेले शिक्षक पात्र ठरतील.

आपसी आंतरजिल्हा बदली शिक्षकांच्या बाबतीत आपसी बदली झालेल्या दोघांपैकी कनिष्ट शिक्षकांची सेवा धरली जाणार असून त्यांना जर १० वर्ष झाले असेल तर ते पण शिक्षक बदली प्राप्त होणार आहे.( दि.28.01.2019 च्या शासन निर्णयान्वये )

जिल्ह्यातील रिक्त जागा, समानिकाणाने रिक्त ठेवायच्या जागांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

अवघड क्षेत्रातील शाळांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

एक ते पाच टप्पे क्रमाने पुर्ण केले करण्यात येईल.

प्रत्येक टप्पा सुरू करण्यापुर्वी रिक्त जागांची यादी जाहिर केली जाईल.

प्रत्येक टप्प्यात अर्ज भरण्यासाठी चार दिवस मुदत असेल.

प्रत्येक बदली आधिकार प्राप्त शिक्षकांना जिल्ह्यांतील ३० शाळांचा  प्राधान्य क्रम आपला टप्पा सुरू होण्यापुर्वी जाहिर केलेल्या रिक्त जागां मधून भरावा लागेल.

संवर्ग १,२, ३ मधील कर्मचाऱ्यास बदलीस नकार असल्यास बदली होणार नाही. पण सेवाने ज्येष्ट किंवा आधिच्या संवर्गातील कर्मचाऱ्याने खो दिल्यास बदली होऊ शकते.त्यासाठी ३० शाळांचा प्राधान्यक्रम भरलेला चांगला राहिल.

शेवटी प्राधान्यक्रमातील शाळा न भेटलेल्या विस्तापित शिक्षकांचा आणि प्राधान्यक्रम न भरलेल्या शिक्षकांचा टप्पा होईल.

व्याख्या

1)अवघड क्षेत्र : परिशिष्ट १ मध्ये नमूद असणाऱ्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल.

2)सर्वसाधारण क्षेत्र :- वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.

3)बदली वर्ष :- ज्या कैलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.

4)बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा.

5)शिक्षक या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक

6)सक्षम प्राधिकारी : शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील.

7 ) बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक: बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक तसेच सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक.

विशेष संवर्ग शिक्षक भाग १:

खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून गणले जातील.

1) पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)

2) दिव्यांग शिक्षक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११ मधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलाचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक.

3) हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक

4) जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस सुरु असलेले शिक्षक

5) यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.

6) कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

7)मेंदूचा आजार झालेले शिक्षक

8) थैलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक / जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे •आजार (उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase defiancy व इतर आजार)} (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ)

9) माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी/ विधवा

10)विधवा शिक्षक

11) कुमारीका शिक्षक

12) परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक

13) वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक

14) स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा/मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)

खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक:

15) हृदय शस्त्रक्रिया झालेले.

16) जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी ) डायलिसीस सुरु असलेले.

विशेष संवर्ग शिक्षक भाग २ : पती-पत्नी एकत्रीकरण

(जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून ३० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)

1) पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर

2) पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी

3) पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी.

4) पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका/नगरपालिका

4) पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी.

6) पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक / कर्मचारी.

जिल्हा परिषद शिक्षक बदली

  मित्रांनो “जिल्हा परिषद शिक्षक बदली” संबधी माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.

       सदरील लेखा मधील कोणताही मजकूर, माहिती, फोटो किंवा इ.कोणत्याही प्रकारच्या माहितीचा वापर आपणास स्वतः च्या ब्लॉग किंवा इतर कमर्शियल लिखाणासाठी वापरता येणार नाही. वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment