Top Harbhara Variety : मित्रांनो रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणजे हरभरा होय.महाराष्ट्रातील सर्वच विभागात आंतरपीक त्याचबरोबर पिकाचे फेर पालट करण्यासाठी हरभरा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. हरभरा पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते, पोत टिकून राहतो.
हरभरा हे डाळवर्गीय पीक असल्यामुळे या पिकांच्या मुळातील गाठी मधील रायभोजन विषाणूमुळे हवेतील नत्राचे साधारणपणे १३५ किलो प्रति हेक्टरी स्थिरीकरण केले जाते.त्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत होते. आज आपण महाराष्ट्रातील विविध भागात उपयुक्त अशा बागायती, कोरडवाहू व काबुली वाणाची माहिती या लेखात बघणार आहोत.
Top Gram variety in Maharashtra
विजय :- विजय हरभरा वाणाचा कालावधी जिरायती शेतात ८५-९० दिवस तर बागायती साठी १०५-११० दिवस आहे. या वाणाची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास अधिक उत्पादन क्षमता, मर रोगास प्रतिकारक्षम, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता, जिरायती, बागायती भागास आणि उशिरा पेरणीस योग्य आहे.महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यासाठी प्रसारित करण्यात आले होते.
- उत्पादन (क्विंटल हे.)
- जिरायती प्रायोगिक उत्पादन १४-१५,
- बागायती प्रायोगिक उत्पादन ३५-४०, सरासरी उत्पादन २३
विशाल :- विशाल या वालाचा पिकाचा कालावधी कालावधी बागायती ११०-११५ दिवस आहे. या वाणाची वैशिष्ट्य सांगायचे झाल्यासआकर्षक पिवळसर टपोरे दाणे, १०० दाण्याचे वजन २८ ग्रॅम, पर रोगास प्रतिकारक्षम, प्रथिनांचे प्रमाण अधिक असते.धाटे आकाराने मोठे असून गर्द हिरवे, पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित
- उत्पादन (क्विंटल /हेक्टरी )
- जिरायती प्रायोगिक उत्पादन १४-१५ सरासरी उत्पादन १३
- बागायती प्रायोगिक उत्पादन ३०-३५ सरासरी उत्पादन २०
दिग्विजय :- सदरील वाणाचा कालावधी बागायती ११०-११५ दिवस आहे. दिग्विजय वानाचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास पिवळसर तांबूस टपोरे दाणे, १०० दाण्यांचे वजन २४ सँग मर रोगास प्रतिकारक्षम, जिरायती, बागायती तसेच उशिरा पेरणीत योग्य आहे.पाटे आकाराने मोठे असून गर्द हिरवे, महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित करण्यात आले आहे.
- उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)
- जिरायती प्रायोगिक उत्पादन १४-१५
- बागायती प्रायोगिक उत्पादन ३५-४० सरासरी
फुले विक्रम :- वाणाचा पक्वता कालावधी १०५-११० दिवस आहे. सदरील वाणाचे वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास घाटे जमिनीपासून एक फुटाच्यावर लागतात. वाढीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास उपयुक्त असते .या वाणाचे पीक लोळत नाही, मा रोगास प्रतिकारक्षम,अधिक उत्पादन क्षमता असलेले वाण आहे.हे वाण महाराष्ट्र,मध्य प्रदेश, गुजरात, दक्षिण राजस्थानसाठी प्रसारित करण्यात आले आहे.
- उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)
- जिरायती प्रायोगिक १६-१८
- बागायती प्रायोगिक ४०-४२
फुले विक्रांत :- फुले विक्रम बोलायचं वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास पक्वता कालावधी १०५ ते ११० दिवस असून दने पिवळसर तांबूस मध्यम आकाराचे दाणे, १०० दाण्यांचे वजन १९.९ ग्रॅम,बागायती पेरणीसाठी योग्य, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश दक्षिण राजस्थान राज्यासाठी प्रसारित करण्यात आले आहे.
- उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)
- उत्पादन क्षमता ४१.६६
- सरासरी उत्पादन २०
Best variety of Harbhara
फुले विश्वराज :- फुले विश्वराज वाणाचा पक्वता कालावधी १५-१०५ दिवस आहे.वाणाची वैशिष्ट्य पाहिजे असेल तर पिवळसर तांबूस रंगाचा,मध्यगदाणे असून, १०० दाण्यांचे वजन २२ ग्रॅम असते. सदरील वाण जिरायती पेरणीसाठी योग्य, मर रोग प्रतिकारक्षम, पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आले आहे.
- उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)
- जिरायती प्रायोगिक उत्पादन २८-२९
- सरासरी उत्पादन १५-१६
जाकी – ९२१८ :- हे वाण विदर्भ विभागासाठी प्रसारित करण्यात आले आहे. वाघाची वैशिष्ट्ये जर पाहिले तर मर रोग प्रतिकारक्षम १०० दाण्याचे वजन २२-२६ ग्रॅम भरते.
- उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)
- जिरायती उत्पादन १५-१६
- बागायती उत्पादन २६-२८
PDKV कांचन :- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ द्वारे प्रसारित वाणाचा पक्वता कालावधी १०५-११० दिवस असून मर रोग प्रतिकारक्षम, टपोरे दाणे, विदर्भ विभागासाठी प्रसारित करण्यात आले आहे.
- उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)
- बागायती प्रायोगिक उत्पादन ३५-४२,
- सरासर उत्पादन १८-२०
पीडीकेव्ही कणक :- PDKV कणक पक्वता कालावधी १०८-११० यांत्रिक पद्धतीने काढणीकरता योग्य, संरक्षित ओलिताखाली लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहे.सदरील वाण महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातसाठी प्रसारित, उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)
- सरासरी उत्पादन १८-२०
BDNG – ७९७ :– हे वाण मराठवाडा विभागासाठी प्रसारित करण्यात आले आहे.मर रोग प्रतिकारक्षम, मध्यम आकाराचे दाणे, १०० दाण्याचे वजन १८-२० ग्रॅम, अवर्षण प्रतिकारक्षम असलेले वाण आहे.
- उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)
- जिरायती उत्पादन १४-१५
- बागायती उत्पादन २०-२२
जवाहर ग्राम – २४ :- जवाहर ग्राम म्हणजेच हरभरावानाचा परिपक्वता कालावधी ११०-११५ दिवस आहे. या वाणची वैशिष्ट्ये म्हणजे पर रोग प्रतिकारक्षम, यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास उपयुक्त असून १०० दाण्याचे वजन २९.३ ग्रॅम भरते. सदरील वाण महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यासाठी प्रसारित करण्यात आले आहे.
- उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी ) २२ -२३
महाराष्ट्रातील सर्वोत्तम काबुली हरभरा वाण येथे पहा