Sukanya Samriddhi Scheme : ही केंद्र शासनाची मुलींच्या कल्याणासाठी सुरु केलेली एक महत्वाकांक्षी सरकारी योजना आहे. सुकन्या समृद्धी योजनेत मुलींचे शिक्षण आणि लग्नासाठी मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरदूत करण्याची व्यवस्था सुकन्या समृद्धी योजनेत मिळते.
मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठीची गुंतवणूक जर पालकांनी मुलीच्या जन्मापासून केली तर योग्य वेळी त्याचा योग्य परतावा मिळतो. आज अशाच एका महत्वाच्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. केंद्र शासनाची सुकन्या समृद्धी योजना (SSY) 2022 माहिती सुकन्या समृद्धी योजनेची माहिती पाहणार आहोत.
Sukanya samriddhi scheme |
सुकन्या समृद्धी योजना
केंद्र शासनाने ‘सुकन्या समृध्दी योजना’ २२ जानेवारी २०१५ रोजी सुरु केलेली आहे.केंद्र शासनाने मुलींच्या कल्याणासाठी सुरु केलीली योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना या योजनेलाच सुकन्या समृद्धी खाते म्हणून देखील ओळखले जाते. प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांना मुलीच्या भविष्याची चिंता असते.
त्याप्रमाणे पालक मुलींच्या जन्मापासूनच मुलींच्या भविष्यातील शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक सुरु करतात. त्यामध्ये एल आय सी (LIC) , शासकीय योजना मध्ये गुंतवणूक करून आर्थिक नियोजन करतात. आणि हे प्रत्येक पालकांसाठी योग्य निर्णय असतो. आज केलेली गुंतवणूक उद्याच्या भविष्यात योग्य वेळी याची मदत होते. आणि महत्वाचे म्हणजे आर्थिक नियोजन व्यवस्थित असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना समाधान प्राप्त होते.
Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi yojana
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुम्हीही तुमच्या मुलीचे खाते उघडण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या. या योजनेत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.
या योजनेचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीसाठी मोठा निधी तयार करू शकता. ही योजना केंद्र सरकारने सुरू केली होती, जेणेकरून देशातील मुलींना शिक्षण किंवा लग्नासाठी निधी सहज मिळू शकेल. परंतु या योजनेत पाच मोठे बदल करण्यात आले आहेत. हे बदलते नियम तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.
Sukanya Samriddhi Marathi
सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या ८.४ टक्के इतका व्याज दर दिला जात आहे. या योजनेत गुंतवणूक करताना जो व्याज दर असतो तोच पूर्ण कालावधी संपेपर्यंत मिळतो. त्यामुळे तुम्ही जर आता (एप्रिल ते जून २०२०) या कालावधीत खाते सुरू केले असेल तर ८.४ टक्के इतका व्याज दर मिळतो.
एखाद्या आई-वडिलांनी मुलीचे वय एक वर्ष असताना प्रत्येक महिन्याला या योजनेत १२ हजार ५०० रुपये जमा केले तर वर्षाला १.५ लाख इतके होतात. मुलीचे वय २१ वर्ष होईपर्यंत ६३.७ लाख रुपये जमा होतील.
sukanya samriddhi calculater |
यातील २२.५ लाख ही तुमची गुंतवणूक असेल तर ४१.२९ लाख हे व्याज असेल. म्हणजेच यातील ३५.२७ टक्के रक्कम ही तुमची गुंतवणूक रक्कम तर ६४.७३ टक्के रक्कम ही व्याज आहे. याच हिशोबाने आई-वडील दोघांनीही मुलीसाठी गुंतवणूक केल्यास २१व्या वर्षी मुलीसाठी १.२७ कोटी रुपये इतकी रक्कम तुमच्या हाती मिळू शकते.