Close Visit Mhshetkari

Government employees : खुशखबर.. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे वेळापत्रक आले! पहा वेळापत्रक व शासन निर्णय

Government employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली असून  आता लवकरच प्रमोशन म्हणजे पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी सामान्य प्रशासन विभागात एक समिती घटीत करण्यात आलेले असून आता हा प्रमोशनचा प्रोग्राम कसा असेल याची सविस्तर माहिती आपण या लेखा मध्ये बघणार आहोत.

Government employees promotion updates

पदोन्नतीचे प्रस्ताव जलद गतीने निकाली काढण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने दि.9 मार्च 2022 रोजीच्या परिपत्रकान्वये सूचना निर्गमित केलेल्या आहेत.पदोन्नतीचे प्रस्ताव जलद गतीने निकाली काढण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दि.1 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णय निर्गमित झाला होता.

आता पदोन्नतीच्या (promotion) कार्यवाही बाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार विहित कालावधीत प्रस्ताव निकाल काढण्याबाबत व त्याबाबतची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

Government employee’s news

शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधील गट क व गट ड मधील पदांवर पदोन्नती करण्यात येणार आहे.पदोन्नतीचे प्रस्ताव तपासून पात्र व्यक्तींची पदोन्नतीसाठी शिफारस करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत विभागीय पदोन्नती समिती गठीत करण्यात येणार आहे.

हे पण पहा --  Employees News : खुशखबर... सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनअनुदान संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित

सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन पदोन्नतीची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याकरीता कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

Leave a Comment