Sbi bank : SBI च्या ग्राहकांसाठी कामाची बातमी आहे.बँकेने आता एटीएममधून (ATM) पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत.दरम्यान ATM व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे Sbi बॅंकेने ATM व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.ज्याद्वारे एटीएम मधून पैसे काढणे सुरक्षित होणार आहे.जाणून घेऊया नियमाबद्दल सर्व माहिती. .या नियमाबद्दल जाणून घेऊया.
sbi atm cash withdrawal rules on otp based
फसवणुकीला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना एटीएमच्या माध्यमातून कार्डलेस कॅश विड्रॉव्हल () सुरू करण्याची परवानगी देण्यास सांगितले होते.यासोबतच UPI चा वापर करत सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कमध्ये कार्डलेस कॅश विड्रॉल सेवा उपलब्ध करून देण्यास सुरूवात झाली आहे.सध्या सर्व बँकांनी ही सुविधा सुरू केलेली नाही.पण एसबीआय बॅंकेने ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी बँकेने 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्यावर नवीन नियम लागू केले आहे.
Sbi bank new rules
आता SBI च्या ATM मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला एक विशेष क्रमांक द्यावा लागेल.जर तुम्ही हा नंबर टाकला नाही तर तुमचे पैसे निघणार नाहीत. SBI बॅंकेने ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे. आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.हे नवीन तंत्रज्ञान onetime password च्या ATM निगडीत आहे.ग्राहकाचा मोबाइल क्रमांक स्टेट बँकमध्ये नोंदणीकृत असेल,तर त्याच क्रमांकावर OTP येईल,जो प्रविष्ट केल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येतील.
SBI बॅंकेने ग्राहकांना त्यांच्या ATM मधून प्रत्येक वेळी त्यांच्या बँक खात्यातून नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि डेबिट कार्ड पिनवर पाठवलेल्या ओटीपीसह 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी देते.त्याची संपूर्ण process जाणून घेऊया.
sbi atm cash withdrawa new process
- सर्व प्रथम तुम्हाला नेहमी प्रमाणे ATM मधून पैसे काढण्याची Pin टाकून रक्कम टाकण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
- नंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
- हा OTP चार अंकी क्रमांक असेल जो ग्राहकाला एका व्यवहारासाठी मिळेल.
- तुम्ही काढू इच्छित असलेली रक्कम टाकल्यानंतर तुम्हाला ATM स्क्रीनवर OTP टाकण्यासाठी सांगितल जाईल.
- रोख पैसे काढण्यासाठी तुम्हाला या स्क्रीनमध्ये बँकेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP टाकावा लागेल.