Close Visit Mhshetkari

Srinivasa Ramanujan : राष्ट्रीय गणित दिवस | थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी या गोष्टी माहिती आहे का?

Srinivasa Ramanujan : आज आपण थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी संपूर्ण माहिती या लेखात बघणार आहोत.22 डिसेंबर हा त्यांचा जन्म दिवस भारतीय ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून साजरा करतात.

थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात कुंभकोणम जवळील इरोड नावाच्या गावात झाला. 

रामानुजन यांचे  बालपण अत्यंत हालाखीत गेले.त्यांचे वडील एका स्थानिक व्यापायाकडे अर्धवेळ लिपिक म्हणून काम करत असत. एका अपत्याचे पालनपोषण करणेही त्यांना त्याकाळी शक्य नव्हते.

श्रीनिवास रामानुजन यांचे शिक्षण

1897 मध्ये दहा वर्षांचे असतांना प्राथमिक शाळेच्या परिक्षेत रामानूजन प्रथम आले.त्यामुळे त्यांना माध्यमिक शिक्षण मोफत मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आणि पुढे माध्यमिक शाळेत देखील गणित विषयाच्या सर्व परिक्षामध्ये ते प्रथम क्रमांकाने पास झाले तसेच त्यांना अनेक पारितोषकही मिळाली.

  • शासकीय कला महाविद्यालय (पदवी नाही)
  • पचयप्पा कॉलेज (पदवी नाही)
  • ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज (बॅचलर ऑफ आर्ट्स बाय रिसर्च, 1916)

सन 1909 मध्ये रामानुजन यांचा विवाह 9 वर्षांच्या बालवधू एस.जानकी अम्मल यांच्याशी झाला होता.

Srinivasa Ramanujan
Srinivasa Ramanujan

श्रीनिवास रामानुजन यांचे लेखन

Ramanujan यांना मद्रासच्या पोर्ट ट्रस्टच्या लेखा विभागात लिपिक म्हणून नोकरी मिळाली कार्यालयातून वेळ मिळाला की ते संशोधनपर लेख लिहित,त्यांचे ते लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रकाशित झाले

रामानुजन यांनी आपली १२० प्रमेये व सूत्रे (बीअरम्स व फॉम्यूले) केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रीनटी महाविद्यालयातील फेलो प्रसिद्ध गणितज्ञ प्रा. गॉडफे एच हार्डी यांना पाठवली. पोस्टाने मिळालेल्या या वह्या न्याहाळल्यावर त्यांनी आपले सहकारी प्राध्यापक लिटलवूड यांच्याशी याविषयी चर्चा केली. या वह्या लिहिणाऱ्या लेखकाची प्रतिभा त्यांना जाणवली.

१७ एप्रिल १९१४ रोजी ते इंग्लंडला पोहोचले.नंतर हार्डी व लिटलवुड यांच्या मार्गदर्शखाली रामानुजन यांनी पद्धतशीर अभ्यास व संशोधनास सुरुवात केली.इंग्लंडच्या पाच वर्षाच्या वास्तव्यात त्यांचे २५ शोधनिबंध प्रकाशित केले गेले.यामुळे गणिताच्या विश्वात  श्रीनिवास रामानुजन यांचे लेखन  लोकप्रिय झाले.

रामानुजन्सनोटबुक्स (Ramanujan’s Notebooks) 

श्रीनिवास रामानुजन त्या काळातील महान गणितज्ञामध्ये एक मानण्यात येई. जाडजूड अशा तीन वह्यामध्ये असणारे गणितातील त्यांचे संशोधन कार्य आज या नावाने ओळखले जाते. त्यांचे हे साधन नंतर तर प्रगल्भ आभासाचा विषय ठरले. इ.स. १९२७ मध्ये केंब्रिज विद्यापीठाने या संशोधन कार्याचे हार्डी यांच्याकडून संपादन करवून घेऊन ते प्रकाशित केले. त्यांचे काही संशोधन अजूनही अप्रकाशित आहे. रामानुजन यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई यांच्या गणित विभागाने त्यांच्या अनेक कृती संपादित व प्रकाशित केल्या.

रामानुजन यांना मिळालेले पुरस्कार 

१. १ मे १९१३ पासून गणितात संशोधन करण्यासाठी मद्रास विद्यापिठाकडुन शिष्यवृत्ती मिळाली. 

२. ऑक्टोबर १९१८ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना फेलो करून घेतले हा सम्मान मिळवणारे ते दुसरे भारतीय होते. फेब्रुवारी १९९८ साली नौदल अभियंता आरदेशजी खोरदेशजी पाना ट्रीनीटी महाविद्यालयाकडून असा सन्मान मिळाला होता ते पहिले सन्मानित भारतीय होते.हे रामानुजन यांना मिळालेले पुरस्कार आहेत.

रामानूजन यांचा मृत्यू

अस्वास्थ्याचे कारण आता हेपॅटिक अमिबियासिस असल्याचे मानले जाते.रामानुजन 1919 मध्ये यांना भारतात परतावे लागले. रामानूजन यांचा मृत्यू वयाच्या 32 व्या वर्षी 1920 कुंभकोणम, मद्रास प्रेसिडेन्सी, (ब्रिटिश भारत) येथे झाला. हार्डी यांना जानेवारी 1920 लिहिलेली त्यांची शेवटची पत्रे , दाखला होता की ते अजूनही नवीन गणिती कल्पना आणि प्रमेय तयार करत होते. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षातील शोध असलेली त्यांची “हरवलेली नोटबुक” 1976 मध्ये पुन्हा सापडली तेव्हा गणितज्ञांमध्ये मोठी खळबळ उडाली.

Greatest Indian Mathematician Srinivasa Ramanujan

‘पॉल एर्डोसने गणितज्ञांचे वैयक्तिक रेटिंग दिले आहे. समजा गणितज्ञांना 0 ते 100 या आधारावर रेट या स्केलवर रेटिंग करायचे झाल्यास,हार्डीने स्वत:ला 25,जेई लिटलवूडने 30, डेव्हिड हिल्बर्टने 80 आणि रामानुजनने 100 गुण दिले आहेत.

आयआयटी मद्रास येथे मे 2011 च्या व्याख्यानादरम्यान बर्नडट म्हणाले की, गेल्या 40 वर्षांत,रामानुजनचे जवळजवळ सर्व अनुमान सिद्ध झाल्यामुळे, रामानुजन यांच्या कार्याची आणि प्रतिभाची अधिक प्रशंसा झाली होती,आणि रामानुजन यांचे कार्य आता आधुनिक गणित आणि भौतिकशास्त्राच्या अनेक क्षेत्रांमध्ये व्यापलेले आहे.

मित्रांनो हा लेख कसा वाटला कमेट्स द्वारे नक्की कळवा. आवडला असल्यास व्यक्तींना नक्की शेअर करा.

Leave a Comment