Shauchalay yojana marathi स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी वैयक्तिक शौचालय उपलब्धता आणि त्याचा वापर या गोष्टींवर भर देण्यात येत आहे.शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान 12 हजार रूपये इतके करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.महाराष्ट्र शौचालय बांधकाम योजनेसाठी पात्रता,कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी आहे ? याची सगळी माहिती आज आपण जाणून घेऊ या.
Shauchalay anudan yojana |
शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र
केंद्र आणि राज्यस्तरावर राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे नामकरण ‘स्वच्छ भारत मिशन’ असे करण्यात आले आहे. या मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी 12 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने 7 नोव्हेंबर 2014 रोजी घेतला आहे. या बारा हजार रूपयात केंद्राचा हिस्सा 75 टक्के म्हणजे नऊ हजार रुपये तर राज्याचा हिस्सा 25 टक्के म्हणजे तीन हजार रूपये इतका राहणार आहे.
शौचालय अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील गरीब तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबे जे वैयक्तिक शौचालय बांधण्यास इच्छुक आहेत परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे ते वैयक्तिक संडास बांधण्यास असमर्थ असतात अशा कुटुंबांना शौचालय अनुदान योजनेच्या सहाय्याने वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते.या योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12000 /- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच देण्यात येणारी अनुदान राशी 2 टप्प्यात देण्यात येते.
Shauchalay Bandhkam Anudan Yojana
शौचालय अनुदान योजना अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांसाठी ज्यांच्याकडे शौचालय नाही,अश्या व्यक्ती करिता स्वच्छ भारत अभियान (ग्रा.)अंतर्गत दुसऱ्या टप्प्या अंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ग्रामीण भागातील लोकांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी अनुदान देणारी ही एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.Shauchalay Bandhkam Anudan Yojana ही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येणारी एक केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेली महत्वपूर्ण अशी योजना आहे.ही योजना केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असते.
महाराष्ट्र शौचालय बांधकाम योजना ही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेली लिंक आहे.पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यात महाराष्ट्र शोचली अनुदान योजना सुरू केली आहे . ज्या अंतर्गत महाराष्ट्रात राहणाऱ्या ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील गरीब कुटुंबांना या योजनेअंतर्गत मदत दिली जाणार आहे.
महाराष्ट्र शौचालय योजना पात्रता
महाराष्ट्र शौचालय बांधकाम योजना चा लाभ घ्यायचा असेल,तर तुमच्याकडे खालील आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे
शौचालय बांधकाम योजना महाराष्ट्र अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना यापूर्वी शौचालय बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.या योजनेचा लाभ बीपीएल शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना मिळणार आहे.
अनुसूचित जमाती,अनुसूचित जाती, भूमिहीन मजूर, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती, लहान आणि सीमांत शेतकरी यांसारखी दारिद्र्यरेषेच्या वर राहणारी कुटुंबेही या योजनेसाठी पात्र असतील.शौचालय अनुदान योजना महाराष्ट्राचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
महाराष्ट्र शौचालय बांधकाम योजना कागदपत्रे
शौचालय बांधकाम अनूदान योजनेचा लाभ मिळविण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.महाराष्ट्र शौचालय बांधकाम योजना कागदपत्रे
>> कायम रहिवासी प्रमाणपत्र
>> उत्पन्न दाखला
>> आधार कार्ड
>> मतदार आयडी
>> शिधापत्रिका
>> मोबाईल नंबर
>> बँक पासबुक
>> पासपोर्ट आकाराचा फोटो
Maharashtra Sauchalay Anudan Yojana Beneficiary
•• दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे
•• अनुसूचित जाती
•• अनुसूचित जमाती कुटुंबे
•• लहान व अत्यल्प भूधारक शेतकरी
•• घरकुल असेलेले भूमिहीन मजूर
•• शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती असलेली कुटुंबे
•• कुटुंबातील प्रमुख स्त्रिया
Maharashtra Sauchalay Anudan Yojana Registration Process
महाराष्ट्र शोधली अनुदान योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया “Maharashtra Sauchalay Anudan Yojana Registration Process” सर्वप्रथम तुम्हाला गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
>> अर्जदाराला सर्वात प्रथम स्वतःचे रेजिस्ट्रेशन करावे.
>> अर्जदाराला स्वतःचा मोबाईल नंबर.स्वतःचे नाव,पत्ता,राज्य,कॅप्टचा कोड टाकून Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
>> Registration पूर्ण झाल्यावर तुम्हाला Login Id आणि Password टाकून Sign In करायचे आहे.
>> Login केल्यावर तुम्हाला तुमचा जुना पासवर्ड बदलण्याचे option येईल.आता तुम्हाला जुना पासवर्ड बदलून नवीन पासवर्ड ठेवायचा आहे.
>> आता तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला New Application पर्यायावर क्लिक करायचे आहे.
>> आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती वयक्तिक माहिती,पत्ता तसेच तुमच्या बँक खात्याची माहिती इत्यादी योग्य प्रकारे भरायची आहे.
>> सर्व माहिती भरून झाल्यावर Apply बटनावर क्लिक करायचं आहे.