Close Visit Mhshetkari

दूबार पेरणी नकोय,आजच घरी तपासा बियाण्यांची उगवण क्षमता | Seeds germination power

Seeds germination : पेरणी केल्यानंतर काही दिवसांनी,बहुतेक ठिकाणी बियाणे उगवून आले नसल्याचे शेतकरी बांधवाच्या च्या लक्षात येते.अशावेळी शेतकऱ्याला पुन्हा एकदा बियाणं खरेदी करावे लागते.यासाठी वेळ आणि पैसा खर्च होतो.

थोडक्यात काय शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट येते.हे टाळण्यासाठी शेतकरी घरबसल्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासू शकतो.म्हणजे पेरणी करण्याआधीच आपण जे बियाणे पेरणार आहोत, त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून पाहू शकतो.ते कसे याची माहिती आता आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

Seeds germination power
Seeds germination power

उगवण क्षमता (Seeds germination power)

कृषी केंद्रातून बियाण्यांची खरेदी केल्यानंतर शेतकरी बहुधा थेट शेतात पेरणी करतो आणि मग जवळपास आठवड्याभरात ते पाहायला जातो आणि खूप वेळा शेतकरी बांधवाची निराशा होते. अशा वेळी अशा वेळी बियाणे उगवण क्षमता तपासणे महत्त्वाचे असते.बियाण्यांची उगवण क्षमता म्हणजे एखाद्यात बियाण्यामध्ये उगवून येण्याची किती क्षमता आहे,ते तपासणे होय.

शेतकरी स्वत: घरी करून पाहू शकतील अशा बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याच्या तीन पद्धती आहेत.

>> पहिली म्हणजे गोणपाट पद्धती :- या पद्धतीत शेतकरी स्वत: पोत्यावर बियाणे ठेवून त्यांची उगवण क्षमता तपासू शकतात.

>> दुसरी पद्धत म्हणजे पेपर पद्धती :- या पध्दती मध्ये जर्मिनेशन पेपर (Germination paper) विकत आणून शेतकरी त्यावर बियाणे ठेवू शकतात आणि त्यांची उगवण क्षमता जाणून घेऊ शकतात.

>> तिसरी म्हणजे कुंडी पद्धती :-एखाद्या कुंडीत बियाणे ठेवून त्यांची उगवण क्षमता या पद्धतीद्वारे तपासली जाते.

उगवण क्षमता
उगवण क्षमता

बियाण्यांची उगवण क्षमता

यापैकी सगळ्यात सोपी आहे ती गोणपाट पद्धती.आता ही पद्धत वापरून उदाहरण म्हणून सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण क्षमता कशी तपासायची हे पाहूया.

1 ) सगळ्यांत आधी आपल्याला एक मोठ पोतं आणि पाण्यानं भरलेली बकेट घ्यायची आहे. पोत्याला कात्रीच्या साहाय्यानं कापायचं आहे. त्यानंतर ते पोतं पाण्यात भिवजून आणि नंतर व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे.

2 ) सोयाबीनच्या बॅगेत मध्यभागी हात घालून एक मूठ सोयाबीन घ्यायची आहे. त्यापैकी 100 दाणे तपासणीसाठी लागणार आहेत. हे 100 दाणे त्या पोत्यावर व्यवस्थित 10×10 ची लाईन घेऊन ठेवायचे आहेत. त्यानंतर त्या पोत्याची गुंडाळी करून घ्यायची आहे. ते रबर किंवा दोरीनं बांधून घ्यायचं आहे.

3) हे गुंडाळलेले पोते माठ किंवा रांजण अशा थंड ठिकाणी ठेवायचे आहे. त्यावर दररोज दोन वेळेस पाणी शिंपडायचे आहे.आठव्या दिवशी ही गुंडाळी उघडायची आहे.आठव्या दिवशी बियाण्याची उगवण झालेली असते.बियाणं एकदम सरळ उगवले की समजायचे ते व्यवस्थित आहे.

Germination power
Germination power

अशा प्रकारे तुम्ही एकतर घरच्या बियाण्यांची किंवा दुकानातून खरेदी केलेल्या कंपनीच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून पाहू शकतात.

बोगस बियाणे तक्रार कुठे करायची ?

ज्यावेळी शेतकरी दुकानातून बियाण्यांची बॅग खरेदी करतो and त्यावेळी त्या बॅगवर जर्मिनेशन किती आहे असे लिहिलेले असते. उदाहरणार्थ तुम्ही खरेदी केलेल्या बॅगवर 75% इतकं जर्मिनेशन नमूद केलेले असेल, तर त्याचा अर्थ त्या कंपनीच्या बियाण्यांचे 100 पैकी 75 इतके बियाणे उगवून येणे अपेक्षित असते.
तुम्ही केलेल्या उगवण क्षमतेच्या चाचणीत त्यापेक्षा कमी बियाणे उगवून आल्याचे दिसल्यास तुम्ही कृषी विभागाकडे तक्रार दाखल करू शकता.सामान्यपणे 70% उगवण क्षमता असेल तर ते बियाणे चांगले आहे, असे समजले जाते.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment