Close Visit Mhshetkari

Sarpanch salary news : सरपंच उपसरपंच मानधन वाढले, पहा नवीन शासन निर्णय

sarpanch salary news  : गावामध्ये गावचा कारभार पाहण्यासाठी आपण गावांमध्ये सरपंच व उपसरपंच याची निवड करत असतो कारण की तो गावातील महत्त्वाचा नागरिक असतो तसेच लोकांच्या हिताचा देखील निर्णय घेण्याचे काम हे सरपंचामार्फत होत असते.

Sarpanch mandhan news maharashtra

नागरिकांना विविध समस्या विविध योजनांमध्ये लाभ देण्याचे काम हे सरपंच व उपसरपंच यांच्याकडे असते त्यामुळे आपण आता सरपंच उपसरपंच यांचे पगार व यांना किती पगार असतो ते आपण पाहणारमधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असल्याकारणाने पूर्वी सरपंच, उपसरपंच मानधन व सदस्यांना बैठकभत्ता देण्यात येत नव्हता. 

नंतर,ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णय १ नुसार  ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न विचारात घेता, सरपंचाला मानधन देण्याची सुरवात करण्यात आली.

Sarpanch Pagar In Maharashtra

महाराष्ट्रातील सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याबाबत 1 शासन निर्णय 30 जुलै 2019 रोजी घेण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे

अशी माहिती देण्यात आली आहे. जनतेतून निवडलेल्या सरपंचाचे अधिकार 

हे पण पहा --  Jantetun Sarpanch : जनतेतून सरपंचाची निवड पात्रता,कालावधी,अधिकार,अविश्वास आणि मानधन पहा सर्व माहिती

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम,1959 मधील कलम 33 सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणूकीची कार्यपध्दती विषद करण्यात आलेली आहे.त्याअनुषंगाने उपसरपंच पदाच्या निवडणूकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंच यांना मतदानाचा अधिकार असेल व सदर निवडणूकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असेल.

उपसरपंचा पदाची निवडणूक ही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेणे आणि उपसरपंच यांची निवड करणे कायद्याने बंधनकारक असल्याने उपसरपंच निवडणूकीचे अध्यक्षस्थान सरपंच भुसवत असतो.

सरपंच मानधन वाढणार! 

ग्रामीण भागाच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थेचा खूप मोठा वाटा असतो.ग्रामपंचायतीच्या प्रमूख असलेल्या सरपंचाला फार मोठी जबाबदारी असते.सरपंचाला पूर्वीपेक्षा अधिक अधिकार व कर्तव्य प्राप्त झाले आहेत.

ग्रामपंचायतीच्या कामांचा भार देखील वाढला आहे.काळाच्या ओघात वाढलेल्या महागाईमुळे राज्यातील विविध सरपंच संघटना,संस्था व लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी सरपंच मानधन/सरपंच पगार वाढीसाठी शासनाकडे सतत मागणी होत असताना दिसते.

सरपंच व उपसरपंच मानधन ग्रामपंचायतीच्या  माध्यमातून लोकमत निहाय ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या निकषानुसार सरपंचांना महिन्याला 3000 रुपयापासून 5000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.शिवाय उपसरपंचांना आता लोकसंख्येनुसार 1000 ते 2000 रुपये मानधन मिळणार आहे.

Leave a Comment