Close Visit Mhshetkari

RBI Digital Currency : डिजिटल रुपया म्हणजे नेमकं काय,क्रिप्टोपेक्षा कसा आहे वेगळा? जाणून घ्या कसे होतील व्यवहार

RBI Digital Currency : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी आपल्या डिजिटल चलनावर एक संकल्पना नोट जारी केली, आणि म्हटले की ते लवकरच विशिष्ट वापराच्या प्रकरणांसाठी प्रायोगिक लॉन्च ई-रुपी सुरू करेल.

डिजीटल चलनाची संकल्पना थेट बिटकॉइनपासून प्रेरित असली तरीही ते विकेंद्रित आभासी चलने आणि क्रिप्टो मालमत्तांपेक्षा वेगळे आहे.आज आपण पाहुया डिजिटल चलन म्हणजे काय?त्याचे फायदे सविस्तर माहिती.

डिजिटल चलन म्हणजे काय?

मध्यवर्ती बँकेच्या डिजिटल चलनाला सेंट्रल बँक डिजिटल चलन (Digital Currency) म्हणतात. ज्या देशाची मध्यवर्ती बँक ते जारी करते त्याला त्या देशाच्या सरकारची मान्यता असते. डिजिटल चलनाचा त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या ताळेबंदातही समावेश केला जातो आणि ते देशाच्या सार्वभौम चलनात रूपांतरित केले जाऊ शकते.

डिजिटल चलनाचे दोन प्रकार आहेत

ई-रुपया प्रत्यक्षात ब्लॉकचेनसह (Blockchain Technology) इतर तंत्रज्ञानावर आधारित चलन असेल.डिजिटल चलनाचे किरकोळ आणि घाऊक असे दोन प्रकार आहेत.घाऊक चलनाचा (Wholesale) वापर वित्तीय संस्थांकडून केला जातो, तर किरकोळ डिजिटल चलनाचा किरकोळ (Retail) वापर सामान्य लोक आणि कंपन्या करतात वापरले जाते.

CBDC म्हणजे सेन्ट्रल बँक डिजिटल करन्सी ही एका डिजिटल स्वरूपातील केंद्रीय बँकेची वैध मुद्रा आहे.जी रिझर्व बँकेने जारी केलेल्या नोटाच डिजिटल फॉर्म मध्ये आहेत.कागदी नोटा इतकेच या डिजिटल करन्सीचे मूल्य असून त्याच स्वरूपात त्याचे व्यवहार कॅशलेस स्वरूपात करता येणार आहे.सध्या होलसेल सेग्मेंटसाठी हा प्रयोग राबवला जात आहे.

हे पण पहा --  Salary Account : पगार खाते किती महत्त्वाचे? जाणून घ्या फायदे,प्रकार आणि कोणती बॅंक देते जास्त फायदे

ई – चलनाचे व्यवहार कसे होईल?

E-rupee व्यवहार करताना त्याचे नियमन मध्यवर्ती बँकेकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे हे चलन मोबाईलवरुन सहज एकमेकांना पाठवता येईल आणि त्याचा व्यवहारात वापर करताना धोका राहणार नाही.दैनंदिन खरेदी विक्रीसाठीही डिजीटल रुपीचा वापर होणार.डिजीटल रुपीचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार रिटेल (CBDC-R) आणि दुसरा प्रकार होलसेल (CBDC-W) वापराचा आहे.

रिटेल CBDC सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांना म्हणजेच खासगी क्षेत्र (प्रायव्हेट सेक्‍टर),नॉन फायनन्शिअल कंज्‍यूमर्स आणि बिझनेससाठी वापरता येणार आहे. होलसेल CBDC चा वापर निवडक आर्थिक संस्थांनाच करता येणार आहे.रिटेल CBDC रिटेल ट्रांझेक्‍शनचंच इलेक्‍ट्रॉनिक रुप आहे.त्याचा वापर दैनंदिन खरेदी विक्रीसाठीही करता येणार आहे.

E-Rupee वापर कसा करणार ?

E-Rupee चा वापर आपल्या मोबाइल वॉलेटमधून करता येणार आहे. याशिवाय ग्राहकांना याचा वापर बँक मनी किंवा रोख रकमेसाठीही करता येणार आहे.म्हणजेच डिजीटल रुपीचा वापर करून ग्राहकांना रोख रक्कमही काढता येऊ शकणार आहे. कोणालाही पैसे पाठवण्यासाठीही याचा वापर होऊ शकणार आहे.

 Currency इलेक्ट्रॉनिक रुपात तुमच्या खात्यावर दिसेल आणि त्याचा वापर करून रोख पैसेही काढता येतील.आपण मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने बँकेतील खात्याची माहिती तपासतो तसाच E-Rupee चा वापर करता येणार आहे. डिजीटल रुपीला UPI लाही जोडता येणार आहे.म्हणजेच त्याचा वापर गुगल पे,फोन पे,पेटीएम यातही होईल.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment