Close Visit Mhshetkari

Ration Card Rule उत्पन्न वाढूनही रेशनधान्य घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी,शासनाने घेतला मोठा निर्णय!

Ration Card Rules : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.आजही देशात खूप गरीब लोक आहेत. लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार अनेक फायदेशीर योजना आणत आहे . शिधापत्रिका ही देखील यापैकी एक योजना आहे.शिधापत्रिकेच्या मदतीने गरीब कुटुंबातील लोकांना शासकीय रास्त भाव दुकानातून स्वस्त दरात रेशन मिळू शकते.

Ration cards rules
Ration cards rules

Ration Card Rules in Maharashtra

उत्पन्न वाढूनही जे रेशनधान्य घेत असलेल्यांचे धान्य  बंद होणार आहे. येत्या 01 सप्टेंबरपासून शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे.कौटुंबिक परिस्थिती सुधारूनसुद्धा अनेकजण जुन्या रेशनकार्डचा वापर करत वर्षानुवर्षे स्वस्त किमतीमध्ये धान्य घेतात.

 धक्कादायक बाब म्हणजे अनेकजण स्वस्तातील रेशनधान्य घेऊन ते खासगी व्यक्तींना विकतात त्यामुळे जे गरजू आहेत त्यांना या धान्य मिळत नाही.अशा पद्धताने धान्य विकून ते सरकारची फसवणूक करत आहेत.माणसांना अन्न मिळत नाही काहीजण रेशनधान्य जनावरांना खाद्य म्हणू वापरल्याचंही उघड झाले आहे. तरीसुद्धा हे लोक रेशन धान्यावरील हक्क सोडण्यासाठी तयार नाहीत.

Ration Card New Rule

अलीकडे पात्र नसलेले अनेक लोक राशन घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले त्यामुळे या योजनेसाठी पात्र असलेल्या अनेकांना या योजनेचा लाभ मिळत नाही.त्यामुळे आता अपात्रांना तात्काळ रेशनकार्ड सरेंडर करण्याची मागणी शासनाकडून करण्यात येत आहे.जर कोणी रेशनकार्ड जमा न केल्यास त्याच्यावर चौकशीअंती कायदेशीर कारवाई केली जाईल.

हे पण पहा --  7th pay commission arrears : खुशखबर..'या'राज्य कर्मचाऱ्यांच्या थकित रकमा व्याजासह प्रदान करण्यासंदर्भात शासन निर्णय आला

फौजदारी गुन्हे होणार दाखल

01 सप्टेंबरपासून धान्य निरीक्षकांमार्फत गावोगावी प्रत्येक शिधापत्रिकाधारकांची पडताळणी सुरू होईल.वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.त्यासोबतच खोट्या माहितीद्वारे शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्याकडून मागील धान्याची वसुलीदेखील केली जाणार असल्याची माहिती आहे.

Ration card news

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याने (National Food Security Law) रेशन लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात रेशन मिळणे बंधनकारक केले आहे. यासाठी केंद्र सरकारने रेशन दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (EPOS) उपकरणे इलेक्ट्रॉनिक स्केलसह जोडणे बंधनकारक केले आहे. लाभार्थ्यांसाठी धान्याचे वजन करताना रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि कमी कपात रोखण्यासाठी सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Types of Ration Card

आर्थिक निकषानुसार तीन वेगवेगळे रेशन कार्ड दिले जातात.
“Types of Ration Card”
1) वर्षाला 10 हजारांच्या उत्पन्न असलेल्यांना बीपीएल (BPL- Below Poverty Line) कार्ड दिले जाते.
2) वर्षाला 10 हजारांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या APL (Above Poverty Line) कार्ड दिले जाते.
3) निश्चित उत्पन्न नसलेल्यांना AAY कार्ड जारी केले जाते.

Leave a Comment