Close Visit Mhshetkari

Ration card list : नवीन रेशनकार्ड यादी आली! पहा यादीत नाव आणि गावातील धान्य वाटप माहिती

Ration Card List :नुकतीच ऑनलाईन रेशन कार्डची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यामुळे तुम्हाला आता घरबसल्या रेशन कार्डचे status देखील तपासता येईल.

Online Ration Card List Maharashtra

देशातील गरिबांना मोफत धान्य  मिळावे यासाठी सरकारने रेशन कार्ड  सुरु केले. रेशन कार्डचा वापर फक्त धान्यच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणून देखील करता येतो.

तपासण्यासाठी, महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या mahafood.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.

  • महाराष्ट्राचे (Maharashtra) mahafood.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ उघडल्यानंतर उजव्या बाजूला ऑनलाइन सेवांचा विभाग दिसेल.येथे प्रथम मराठीत ऑनलाइन रास्त भाव दुकाने आणि ऑनलाइन रास्तभाव दुकाने पर्याय निवडा.
  • यानंतर AePDS-सर्व जिल्ह्यांचा पर्याय उपलब्ध असेल.मराठीत AePDS – सर्व जिल्हा या पर्यायावर क्लिक करा.
  • आता पुन्हा एक नवीन वेब पोर्टल उघडेल.येथे तुम्हाला डाव्या बाजूला Report विभाग दिसेल.शिधापत्रिकेतील नाव पाहण्यासाठी RC Details चा पर्यायावर क्लिक करा.

How to add Name in Ration Card

तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव रेशन कार्डमधून कमी केले गेले आहे हे तुम्हाला माहीती करायचे असेल,तर त्यासाठी तुम्हाला https://nfsa.gov.in/Default.aspx या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

हे पण पहा --  Ration card list : आपल्या गावाची नवीन रेशनकार्ड यादी आली! लगेच पहा यादीत नाव

आता तुम्हाला ‘रेशन कार्ड’या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचे राज्य,जिल्हा आणि पंचायत निवडा.

Ration card new rule

पुढे तुम्हाला तुमचे रेशन दुकान,रेशन डीलरचे नाव आणि तुमच्या रेशन कार्डचा प्रकार निवडावा लागेल.यानंतर,कार्डधारकांची यादी तुमच्यासमोर येईल,येथे तुमचे नाव कापले गेले आहे की नाही हे तुम्हाला कळू शकते.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment