Close Visit Mhshetkari

Raju Shrivastav : प्रसिद्ध कॉमेडियन काळाच्या पडद्याआड, जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास,कुटुंब सर्व माहिती

Raju Shrivastav : दिग्गज कॉमेडियन म्हणून ओळखले जाणारे यांचे निधन झाले असून वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होती.परंतु आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

Raju Shrivastav Passed Away

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी सकाळी 21 सप्टेंबर रोजी निधन झाले. ते 58 वर्षांचे होते.दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी शेवट चा श्वास घेतला. गेल्या 40 दिवसांपासून ते हॉस्पिटल मध्ये दाखल होते.जिममध्ये व्यायाम करताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्समध्ये रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र त्यांनी एम्य रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

राजू श्रीवास्तव यांनी हार्ट अटॅकमुळे एम्स हॉस्पीटलमध्ये शेवट चा श्वास घेतला.मेंदूतील एक रक्तवाहिनी ब्लॉक झाली.त्याकरिता न्यूरोफिजिओथेरपीची मदत घेतली जात आहे. तसेच राजू श्रीवास्तव यांच्यावर देशातील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. नितीश नायक यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू आहेत.रक्ताचे पंपिंग करणे हे हृदयाचं काम असते. मात्र आतील भाग डॅमेज झाल्यामुळे हे काम करण्याची क्षमता कमी होते. परिणामी हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात.

राजू श्रीवास्तव यांच्या हृदयात 100 % ब्लॉकेज

राजू श्रीवास्तव यांना एम्सच्या कार्डियाक केअर युनिटमध्ये भरती करण्यात आले होते.या प्रकियेत काल राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफ केली गेली, ज्यामध्ये त्यांच्या हृदयाच्या मोठ्या भागात 100 % ब्लॉकेज आढळून आले होते.
लहानपणापासूनच मिमिक्रीची आवड

राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला. लहानपणीच त्यांना सत्यप्रकाश श्रीवास्तव हे नाव दिले गेले.राजू यांचे वडील एक प्रसिद्ध कवी होते, जे बलई काका या नावाने ओळखले जात होते. राजू श्रीवास्तव यांना मोठं होऊन वडिलांप्रमाणे प्रसिद्ध व्हायचं होतं आणि अपेक्षेप्रमाणे मोठं आव्हान होते.राजूला लहानपणापासूनच मिमिक्री आणि कॉमेडीची खूप आवड होती. यामध्ये त्याला आपले करिअर करायचे होते.

Great Comedian Raju Shrivastav

कॉमेडी किंग बनायचे होते जिथे संधी मिळेल तिथे ते मिमिक्री सुरू करायचे. लोक राजू यांना त्याच्या एखाद्या फंक्शनमध्ये किंवा वाढदिवसाच्या पार्टीत कॉमेडियन म्हणू लागले. हळूहळू काही छोट्या रंगमंचाच्या भूमिकाही राजू यांना ऑफर झाल्या. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले होते की, एकदा ते एका पार्टीत गेला होते आणि परफॉर्मन्स दिला होता. कार्यक्रम संपल्यावर एका व्यक्तीने त्यांना 50 रुपये दिले.राजू यांना वाटले की ही त्यांची फी आहे पण त्या व्यक्तीने सांगितले की तू एक उत्तम विनोदी कलाकार आहेस. हा पुरस्कार आहे.त्यांच्या लक्षात आले की आता आपल्याला या ठिकाणी बंदिस्त राहण्याची गरज नाही. त्या व्यक्तीने त्यांचे आयुष्य बदलून टाकले.

राजू श्रीवास्तव यांचा परिवार

राजू यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.राजू यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची पत्नी शिखा त्यांच्या पाठीशी उभी राहिली. राजूच्या वाईट काळातही शिखाने त्यांची साथ दिली.एका वेब पोर्टलशी बोलताना पत्नी शिखा यांना अश्रू आवरेना झाले.मी सध्या बोलू शकत नाही.मी काय बोलाव हेच मला समजत नाही नाही. त्यांनी खूप संघर्ष केला. मला खरच आशा होती त्यांची प्रकृती चागली होईल.त्यासाठी मी रात्रंदिवस प्रार्थना करत होते. पण असं झालं नाही. त्यांच्या शवटच्या श्वासापर्यंत मी आशा सोडली नव्हती. मी एवढंच म्हणेन की ते खरे लढवय्ये होते.”राजू श्रीवास्तव यांचा परिवार”

Raju shrivasta

राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी,नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि पियुष गोयल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी, चाहते आणि राजकारण्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.यांच्या पार्थिवावर गुरुवारी 22 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नवी दिल्लीतील निगमबोध घाटावर सकाळी 9.30 वाजता अंत्यविधी पार पडेल.

Leave a Comment