Close Visit Mhshetkari

पाईप लाईन अनूदान योजना सुरू,असा घ्या लाभ PVC Pipeline subsidy

PVC Pipeline Subsidy :आज आपण सरकारी अनुदान योजना 2022 संदर्भात जाणून घेणार आहोत, त्याच बरोबर शेतीसाठी पाईपलाईन अनुदान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरावा हे देखील जाणून घेणार आहोत.

महाडीबीटी पोर्टलवर विविध शासकीय योजनांचे अर्ज भरून घ्यावे असे शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. सोबतच विविध शासकीय योजनांचे अर्ज शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर भरू शकतात.जसे कि ट्रॅक्टर योजना, रोटाव्हेटर योजना, कल्टीव्हेटर योजना, ठिबक सिंचन अनुदान योजना, तुषार सिंचन अनुदान योजना इतरही योजनेसाठी शेतकरी अर्ज करू शकतात.

PVC Pipeline subsidy
PVC Pipeline subsidy

पाईपलाईन अनुदान योजना

महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या अनेक योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ दिला जातो.आज आपण पाईप लाईन योजना चा कसा लाभ मिळतो किंवा याबद्दल अटी-शर्ती (Terms and conditions) याचा अर्ज कसा करायचा या सर्वांबद्दल ची माहिती आपण येथे पाहणार आहोत. त्यामध्ये शेती विषयी राबवल्या जाणाऱ्या योजना (Agricultural schemes ) अर्थातच ‘एक अर्ज एक शेतकरी योजना अनेक’ च्या अंतर्गत राबविल्या जातात.जसे की कोरडवाहू क्षेत्र राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या प्रकारच्या योजना देखील महाडीबीटी पोर्टल (MahaDBT portal) च्या अंतर्गत राबवले जातात. तसेच पीव्हीसी पाईप (PVC पाइप) किंवा एचडीपीए पाईप (HDPA pipe) साठी देखील याठिकाणी अनुदान दिले जाते.

शेतकरी मित्रांनो ‘पाईपलाईन अनुदान योजना यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे अर्ज करत असताना तुमच्याकडे किंवा कोणाकडेही असणारा सिंचनाचा स्त्रोत याबद्दलची माहिती अर्जात नमूद करणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये जसे की शेततळे, विहीर किंवा इतर कोणत्या पद्धतीने तुम्ही सिंचन करत आहात.

आपल्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळू शकेल नाहीतर अशा प्रकारचे अनेक अर्ज वर्षानुवर्ष तसेच पडून राहतात त्यावर कोणतीही पुढील शासकीय कारवाई होत नाही त्याच बरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सातबाराला देखील या सिंचनाची नोंद असणे खूप आवश्यक आहे.

PVC pipe subsidy scheme Maharashtra

पाईप लाईन योजना महाराष्ट्र  अंतर्गत 50 टक्के किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये एवढे अनुदान शेतकऱ्यांना (Subsidy for farmers) दिले जाते. ज्यामध्ये पीव्हीसी पाइप साठी 35 रुपये प्रति मीटर आणि जास्तीत जास्त 15 हजार रुपये त्याच बरोबर एचडीपीए साठी 50 रुपये प्रति मीटर जास्तीत जास्त 15 हजार रुपये या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते.

हे पण पहा --  PVC Pipeline scheme : पाईप लाईन अनूदान योजना सुरू,असा घ्या लाभ

एचडीपी पाईप साठी अर्ज केले असता जास्तीत जास्त 300 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते तसेच पीव्हीसी पाईप साठी अर्ज केली असता जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते.

पाईप लाईन अनुदान योजना ऑनलाईन अर्ज

पाईप लाईन अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

>> तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये mahadbt farmer हा कीवर्ड टाइप करा, त्यानंतर इंटर करा.

>> त्यानंतर mahadbt या वेबसाईटची लिंक तुम्हाला दिसेल

>> त्यावर क्लिक करा.

>> जसे तुम्ही या लिंकवर क्लिक कराल त्यावेळी mahadbt या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल.

>> या ठिकाणी वापरकर्ता आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन करा.

(तुमच्या कडे महाडीबीटी अकाउंट नसेल तर अगोदर अकाउंट तयार करून घ्या)

•• लॉगीन केल्यावर याठिकाणी तुम्हाला तुमचा dashboard दिसेल.

•• अर्ज करा अशी एक निळ्या रंगाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

•• योजनेसंबधी सूचना दिसेल ती सविस्तरपाणे वाचून घ्या.

•• मेनू या बटनावर क्लिक करा.

•• सिंचन साधने व सुविधा या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.

•• तालुका गाव सर्वे क्रमांक इत्यादी माहिती टाका.

•• घटक या पर्यायासाठी पाईप्स हा पर्याय निवडा

•• उपघटक या ठिकाणी अनेक पर्याय तुम्हाला दिसतील यापैकी •• pvc pipe हा पर्य्याय निवडा.

•• पाईपची लांबी टाका.

•• अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

•• पहा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

•• योजनांना प्राधान्य द्या.

•• अर्ज सादर करा बटनावर क्लिक करा.

•• पेमेंट करा.

•• पेमेंट पावती व अर्ज केल्याची पावती प्रिंट करा अथवा डाउनलोड करा.

•• अर्जाची स्थिती बघण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा.

PVC Pipeline Subsidy

शेतकरी बांधवाना योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांना हा अर्ज करण्यासाठी अडचण येवू नये यासाठी आम्ही खास शेतकरी बांधवांसाठी एक फाईल तयार केली आहे. ती बघून आपण ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment