Close Visit Mhshetkari

PVC Aadhar Card : आता फक्त 50 रूपयांत मिळवा ATM सारखे स्मार्ट आधार कार्ड ! पहा सविस्तर प्रोसेस… 

 PVC Aadhar Card : आजकाल बहुतेक जन पीव्हीसी आधार कार्ड वापरतात. या नवीन PVC कार्ड अगदी एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्डसारखे दिसते,जे तुम्ही तुमच्या खिशात सहज ठेवू शकता. UIDAI च्या मते, नवीन PVC कार्डची छपाई आणि लॅमिनेशनची गुणवत्ता चांगली आहे,

सदरील कार्ड साठी आपल्याला फक्त 50 रुपये खर्च लागतो.ज्यामध्ये स्पीड पोस्टचा खर्च देखील समाविष्ट आहे. 

How to Download PVC Aadhar Card 

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आता आधार कार्डचे पॉलिव्हिनाईल क्लोराईड म्हणजे PVC Aadhar Card जारी करत आहे.आता हे पीव्हीसी आधार कार्ड कसे ऑर्डर करायचे? याची प्रोसेस सविस्तर पाहूया.

  1. सर्वप्रथम, UIDAI ची अधिकृत वेबसाइट (https://uidai.gov.in) bhet द्या.
  2. येथे ‘माय आधार विभागात’ ‘ऑर्डर आधार PVC Card या वर क्लिक करावे. 
  3. Aadhaar PVC Card वर क्लिक केल्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी EID टाका.
  4. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली सुरक्षा कोड किंवा कॅप्चा कोड टाकून Send OTP वर क्लिक करा. 
  5. आता नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. ओटीपी टाकल्यानंतर खाली दाखवलेल्या सबमिटवर क्लिक करावे.
  6. याठिकाणी तुमच्या आधारशी संबंधित PVC Card ची प्रिव्ह्यू कॉपी दिसेल.
  7. जर तुमचा मोबाईल नंबर आधार लिंक नसेल तर विनंती OTP समोर दिलेल्या संबंधित पर्यायावर क्लिक करा. 
  8. येथे तुमचा मोबाइल नंबर नवीन मोबाइल क्रमांक टाका तुम्हाला OTP पाठवा बटणावर क्लिक करावे लागेल.
  9. शेवटी पेमेंटचा पर्यायवर क्लिक करून डिजिटल माध्यमांद्वारे 50 रुपये भरावे लागतील.
  10. आपले PVC आधार कार्ड मागवले जाईल.सदरील पीव्हीसी आधार कार्ड स्पीड पोस्टद्वारे तुमच्या घरी १५ दिवसात पोहोचेल.
हे पण पहा --  Disguised Aadhar Card : आधार कार्डामुळे होणाऱ्या स्कॅमपासून बचाव करायचा आहे? आजच डाऊनलोड करा मास्क्ड आधार कार्ड ! पहा सोपी प्रक्रिया ..

पिव्हीसी आधार कार्डची वैशिष्ट्ये 

  • UIDAI च्या मते, नवीन PVC कार्डची छपाई आणि लॅमिनेशनची गुणवत्ता चांगली आहे.
  • पीव्हीसी कार्ड आकर्षक आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. 
  • हे पीव्हीसी आधार कार्ड पावसातही खराब होणार नाही. 
  • पीव्हीसी आधार कार्ड आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.
  • सुरक्षिततेसाठी नवीन कॉर्डमध्ये होलोग्राम, गुइलोचे पॅटर्न, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्ट फीचर्स देण्यात आले आहेत. 
  • क्यूआर कोडद्वारे कार्डची सत्यता त्वरित पुष्टी केली जाऊ शकते.

PVC Aadhar Card येथे डाऊनलोड करा

PVC Aadhar Card

Leave a Comment