Close Visit Mhshetkari

Poultry farm : शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू,असा करा अर्ज

Poultry farm : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’राबविण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबविण्यात येणार आहे.

Sharad Pawar Gram Samridi
Sharad Pawar Gram Samridi

Sharad Pawar Gram Samridhi Yojana

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना त्यांच्या जन्म दिवसाच्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबर 2020 रोजी सुरू महाराष्ट्र सरकार ने सुरू केली. या योजनेचे नाव शरद पवारांनी त्यांच्या जन्मतारखेचा सन्मान करण्यासाठी ठेवण्यात आले आहे.

या माध्यमातून खेड्यांचा आणि शेतकर्‍यांचा विकास होईल आणि त्यांना या योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. या योजनेचे नाव श्री शरद पवार साहेब यांच्या नावावर ठेवण्यासाठी महा विकास आघाडीने सुचविले होते. मंत्रालयाने या योजनेस मान्यता दिली आहे.

Gram Samridhi Yojana Marathi

मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी वैयक्तिक लाभाच्या चार योजना ‘शरद पवार ग्रामसमृद्धी‘ योजनेंतर्गत राबविण्यात येणार.(Sharad Pawar Gram Samridhi Yojana Marathi)

1) गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे

स्वत:ची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठ्यासाठी 77 हजार 188 रुपये खर्च येईल. दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा व त्यानंतर अधिक गुरासाठी सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट आणि 18 गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान देय राहील.

2) शेळीपालन शेड बांधणे

किमान दोन शेळ्या असलेल्या भूमीहीन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देता येऊ शकेल. एका कुटुंबास जास्तीत जास्त 30 शेळ्यासाठी तिप्पट अनुदान मंजूर करण्यात येईल.

3) कुक्कुटपालन शेड बांधणे

100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थीना पक्ष्याची संख्या 150 च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. निवारा चांगला नसल्याने कुक्कुट पक्षांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते. यासाठी प्रत्येक शेडला 49 हजार 760 रुपये खर्च अपेक्षित आहे.

4) भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग

शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते. याकरिता शेतात एक नाडेप बांधण्यासाठीची ही योजना आहे. या नाडेपमध्ये सेंद्रीय पदार्थ, कचरा, शेणमाती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात.

हे पण पहा --  Poultry farm yojana : 1 हजार मांसल पक्षी संगोपन योजना सुरू! 2 लाख 25 हजार अनुदानासाठी येथे करा ऑनलाईन अर्ज

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना असा करा अर्ज

सदरील योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. अर्जाच्या नमुन्यानुसार… सुरवातीला तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात,त्यांच्या नावावर बरोबरची खूण करा. त्याखाली ग्रामपंचायतचे नाव, तालुका, जिल्हा टाकायचा आहे.

उजवीकडे तारीख टाकून फोटो चिकटवा. त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाका. आता तुम्ही ज्या कामासाठी अर्ज करणार आहात, त्या कामासमोर बरोबरची खूण करा. येथे मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची यादी आहे.पण,आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्याने नाडेप कंपोस्टिंग,गाय- म्हैस गोठ्यांचं कॉंक्रिटीकरण, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवे आहे त्या कामासमोर बरोबरची खूण करा.

Poultry farm Yojana

इथे प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.त्यानंतर तुमच्या कुटंबाचा प्रकार निवडा. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,भटक्‍या जमाती,भटक्‍या विमुक्त जमाती,दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब,शारीरिक अपंगत्व प्रधान असलेले कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी,अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, 2008 च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारात तुमचं कुटुंब बसत असेल त्यासमोर बरोबरची खूण करा.

तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही त्यासोबत जोडा. लाभार्थींच्या नावे जमीन आहे का, असल्यास “हो’ म्हणून सातबारा,आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडा.

रहिवासी दाखला जोडा तसेच तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, तेही भरा.अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षांवरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहा. शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करा. यासोबत मनरेगाचे जॉब कार्ड, 8-अ, सात-बारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अ चा उतारा जोडा. यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचे एक शिफारसपत्र द्यावे लागणार आहे. यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याबाबत सांगितले जाईल.

कागदपत्रांची छाननी घेण्यासाठी आवश्यक पात्रता

>> महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत.

>> लाभार्थी कोणत्याही संघटनेचा भाग असू नये कारण हि योजना राज्यातील बेरोजगार आणिशेतकऱ्यांसाठी आहे.

>> उत्पन्न प्रमाणपत्र

>> आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र आवश्यक आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment