Fixed Deposit : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहे. प्रत्येक आपल्या पगारातून काही ना काही बचत करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण बचत करत असतो. परंतु कोणताही धोका न पत्करता चांगला मोबदला मिळावा, याकरिता प्रत्येक जाणे हा पर्याय निवडतो.
आपण ज्यावेळेस एफडी हा पर्याय निवडतो त्यावेळी तुम्हाला त्यात त्याच्या अटी व नियम याविषयी माहिती आहे. का माहिती नसेल तर आपण ह्या लेखांमध्ये याविषयी माहिती पाहूया.
Risk in Fixed Deposit
कोणत्याही प्रकारची जोखीम न पत्करता आपण गुंतवलेल्या पैशातून चांगला मोबदला मिळावा यासाठी आपली धडपड असते अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायचा शोध घेत असतात.मित्रांनो तुमच्यासाठी एफडी हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्हाला एफडी केलेल्या पैशावर निश्चित व्याज मिळते .
शेअर मार्केट, व भांडवली बाजारात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तरी तुमच्या एफ डी वर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. म्हणून एफडी च्या माध्यमातून गुंतवला आलेला पैसा हा सुरक्षित मानल्या जातो पण एफडीत गुंतवलेले तुमचे सर्वच पैसे खरंच सुरक्षित आहे का? तुमच्या पैशांना काही धोका आहे का? हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
100 टक्के रक्कम सुरक्षित नसते
मित्रांनो एफडीत गुंतवलेली रक्कम ही इतर गुंतवणुकीच्या तुलनेत सुरक्षित असते. परंतु बँक आर्थिक अडचणीत सापडली बँक डिफॉल्ट झाली तर एफडीत पैसे गुंतवणार्या व्यक्तींचे फक्त पाच लाखापर्यंत ची रक्कमच सुरक्षित राहते. फायनान्स कंपन्यांनाही हा नियम लागू राहतो. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन DICGC ही रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या 5,00,000 लाख रुपये पर्यंत गुंतणुकीवरच विम्याची गॅरन्टी देते.
महागाईत तुमचा नफा घटतो
तुम्ही बँकेमध्ये एफडी च्या माध्यमातून गुंतवलेल्या पैशावर व्याजदर हा अगोदर ठरलेला राहतो. परंतु कालांतराने महागाई वाढत जाते. व त्यामुळे महागाई आणि तुम्हाला एफ डी च्या माध्यमातून मिळणाऱ्या व्याजाची तुलना केली तर मिळालेला मोबदला मूल्य कमी होते. तुम्हाला सांगायचे झाल्यास महागाई दर सहा टक्के वर गेला असे आपण गृहीत धरू शकतो तसेच एफ डी वर तुम्हाला 5 टक्के व्याज मिळत आहे. असे समजून तुम्हाला एफडी ची मुदत संपल्यानंतर मिळालेल्या मोबदल्यात वाढीव मूल्य महागाई दराच्या तुलनेत फार कमी राहील.
प्रत्येक बँकेची प्री-मॅच्यूअर पेनॉल्टी वेगळी
मित्रांनो तुम्हाला गरज पडल्यास एफडी तोडता येते पण त्यासाठी तुम्हाला फ्री मॅच्युअर पेनॉल्ट द्यावी लागते एफडीवर वेगवेगळ्या बॅंका प्री मॅच्युअर पेनॉल्टीवर वेगवेगळी फी आकारत असतात.