Close Visit Mhshetkari

PM Wani yojana आता स्वस्त धान्य दुकानात मिळणार फ्रि वायफाय! पहा लाभार्थी कोण?

PM Wani scheme : केंद्र व राज्य सरकारने महाराष्ट्रात सुरू केली आहे.या योजनेद्वारे  ग्रामीण भागात  free Wi-Fi देण्यात येणार आहे.ग्रामिण भागात  ग्राहकांची संख्या जास्त असूनही ग्रामीण भागातील इंटरनेट घनता शहरी भागातील इंटरनेट घनतेच्या फक्त एक तृतीयांश आहे.

PM wani yojana Maharashtra

Digital क्रांतीनंतर आता शासनाकडून वायफाय क्रांतीही केली जात आहे.आजच्या युगात इंटरनेट ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. त्यामुळे शासन देशातील नागरिकांना वायफाय सुविधा देणार आहे.

 डिजीटल इंडिया नंतर 9 डिसेंबर 2022 रोजी देशातील नागरिकांसाठी दूरसंचार विभाग, संचार मंत्रालय, भारत सरकार यांनी एक नवीन योजना सुरू केली आहे.ज्याद्वारे नागरिकांना वाय-फाय द्वारे इंटरनेटचा मोफत वापर करता येणार आहे.ही योजना पीएम वाणी योजना PM wani yojana Maharashtra म्हणून ओळखली जाते.

PM wani Yojana 2022

PM wani yojana या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संपूर्ण भारतभर सार्वजनिक डेटा कार्यालये उघडली जातील. या योजनेच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक ठिकाणी वाय-फायची सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे ज्याद्वारे डिजीटल तंत्रज्ञानासोबतच वाय-फाय तंत्रज्ञान विकसित होईल.

पीएम वाणी योजना 2022

PM वाणी योजना 2022 सुरू करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट सर्व सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे जेणेकरून देशातील सर्व नागरिक इंटरनेटशी जोडले जाऊ शकतील आणि घरबसल्या ऑनलाइन सुविधांचा लाभ घेऊ शकतील.

सार्वजनिक डेटा कार्यालयाद्वारे नागरिकांना सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क प्रदान केले जातील. त्यामुळे देशभरात सार्वजनिक डेटा कार्यालये उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.

वाणी योजना नवी दिल्ली, मध्य प्रदेशातील उज्जैन, उत्तर प्रदेशातील 10 जिल्हे,उत्तराखंडची राजधानी डेहराडून,आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्हा इ. येथील रास्त भाव दुकानांतून यशस्वीरित्या सुरु करण्यात आलेली आहे.

Leave a Comment