Close Visit Mhshetkari

PM Kisan registration : पीएम किसान योजना नवीन नोंदणी सुरू,पहा यादीत नाव आणि लगेच येथे करा नोंदणी

PM Kisan registration : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नवीन नाव नोंदणी सुरू झाली असून ही नोंदणी कशी करावी? आवश्यक पात्रता काय? कागदपत्रे कोणते लागतात याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशभरातील गरीब शेतकऱ्यांण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम एका आर्थिक वर्षात तीन समान हप्त्यांमध्ये जमा होते.

 अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात 1/12/2018 पासून राबवण्यास सुरुवात झाली.साधारणपणे 31 मार्च पुर्वी तेरावा हप्ता जमा होऊ शकतो.

PM Kisan Registration

करायचे असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना 3 पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

  • शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नाव नोंदणी करू शकतात. तसेच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.
  • PM Kisan या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रे गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागते.
  • CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो.इथे नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क आकारले जाते.
हे पण पहा --  Nomo kisan : नमो शेतकरी सन्मान निधी संदर्भात महत्त्वाची अपडेट दिवाळी पूर्ण होणार खात्यात पैसे जमा! येथे पहा यादी

पीएम किसान योजना पात्रता

पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो,ते बँक खाते आधार कार्डाशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तुम्ही जर सरकारी कर्मचारी,लोकप्रतिनिधी,करदाते असाल तर आपणास पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही.

पीएम किसान योजना आवश्यक कागदपत्रे

पीएम किसान योजना आवश्यक कागदपत्रे” पुढील प्रमाणे आहेत.

  1. आधारकार्ड
  2. सातबारा
  3. बॅंक पासबुक
  4. पासपोर्ट फोटो

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

1 thought on “PM Kisan registration : पीएम किसान योजना नवीन नोंदणी सुरू,पहा यादीत नाव आणि लगेच येथे करा नोंदणी”

Leave a Comment