Close Visit Mhshetkari

PF Account Balance जाणून घ्या मोबाईल वर अवघ्या 5 मिनिटांत!

PF Account Balance : अवघ्या 5 मिनिटांत जाणून घ्या लेखा जोखा ठेवणारी EPFO ही एक सरकारी संस्था आहे,जिथे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक बाबींची तरतूद करण्यात आलेली असते.

PF balance check online

EPFO च्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ही रक्कम पाहू शकता. यासाठी तुम्हाला फक्त Universal Account Number (UAN) देणे गरजेचे असते. UAN क्रमांक हा 12 आकड्यांचा क्रमांक असतो.UAN क्रमांक टाईप केल्यानंतर सुरु होणाऱ्या विंडोवर तुम्हाला “For Employees”वर क्लिक करावे लागेल.येथे तुम्ही “Member Passbook” या पर्यायावर क्लिक करा.

PF balance check number

PF Account Balance पाहण्यासाठी आणखी एक सोपी पद्धत म्हणजे 7738299899 या क्रमांकावर SMS पाठवून रक्कम पाहणे होय.येथे तुम्ही UAN आणि Bank Account नंबरमधील शेवटचे चार आकडे माहिती द्यावी लागते..तसेच आपण 9966044425 या क्रमांकावर मिस कॉल देऊन बॅलन्स चेक करू शकता.पण,यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक PF खात्याशी लिंक असावे लागते.

हे पण पहा --  Provident Fund : पीएफ खातेधारकांना मिळणार 7 लाख रुपयांचा लाभ, काय आहे योजना पहा सविस्तर?

PF Mobile app

तुम्ही ईपीएफओच्या ॲपवरूनही PF खात्यातील रक्कम पाहू शकता.यासाठी तुम्ही सर्वप्रथम EPFO वर नोंदणी करून तिथे तुमचा UAN नंबर लिंक करावा लागतो.पीएफ रक्कम पाहण्यासाठी सध्याच्या घडीला सर्वाधिक वापरल्या जाणारी पद्धत आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment