Petrol Pump Business : पेट्रोल पंपचा व्यवसाय हा संपूर्ण जगभरात फायद्याचा व्यवसाय मानला जातो.देशाला लागणाऱ्या एकूण इंधनापैकी 70 टक्क्यांहून अधिक आयात करावे लागते. पेट्रोल आणि डिझेलचे तर देखील वाढत असतात.जाणून घ्या पेट्रोल पंपचा व्यवसाय कसा सुरू कराल.
petrol pump business |
How to start a petrol pump
Petrol pump business in marathi
1. तुमच्याकडे जमिनीची संपूर्ण सरकारी कागदपत्रे असली पाहिजेत.
2. जमिनीचा नकाशा तयार करावा.
3. जमीन जर शेतजमीन असेल, तर ती अकृषिक जमिनीत बदलावी लागेल, तरच तुम्ही पेट्रोल पम्प उघडू शकाल.
4. जर तुमच्याकडे स्वतःची जमीन नसेल, तर NOC म्हणजे मुळ मालकाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल.
5. ज्या जमिनीवर पेट्रोल पम्प उघडायचा आहे त्या जमिनीवर वीज आणि पाणी असावे.
6. ज्या ठिकाणी पेट्रोल पम्प उघडायचा आहे ती जागा रस्त्याच्या कडेला असावी.
पेट्रोल पंप उघडण्यासाठी पात्रता
भारतात पेट्रोल पम्प उघडण्यासाठी खालील पात्रता आणि अटी अनिवार्य आहेत.
1. अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
2. अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असावे.
3. अर्जदार किमान दहावी पास असावा.
गुंतवणूक किती करावी लागेल ?
पेट्रोल पंप व्यवसाय मध्ये मोठा नफा असतो त्यामुळे त्यातील गुंतवणूक देखील मोठी असते.साधारणपणे ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर कमीत कमी 20 लाख रुपये तर शहरी भागात सुरू करायचा असेल तर 35 ते 40 लाख रुपये गुंतवणूक करावी लागते.
पेट्रोल पंपचे कसे वाटप होते ?
इंडियन ऑइलच्या वेबसाइट नुसार पेट्रोलियम कंपन्या त्यांच्या त्यांच्या फिल्ड टीमद्वारे तयार करण्यात आलेल्या रिसर्चनुसार पेट्रोल पंप सुरू करायचा ही नाही याचा निर्णय घेते. एखादे ठिकाण व्यवसाय करण्यासाठी योग्य असेल तर कंपनीकडून तसा निर्णय घेतला जातो. यासाठी वृत्तपत्रात जाहिरात देऊन इच्छुक व्यक्तींकडून प्रस्ताव मागितले जातात. याचे तपशील तुम्हाला www.iocl.com येथे मिळू शकतील.
कमिशन किती मिळते ?
पेट्रोल पंप चालकांना इंधन विक्रीच्या माध्यमातून कमिशन दिले जाते.पेट्रोलच्या एका लिटर मागे 2.90 रुपये तर डिझेलच्या एका लिटर मागे 1.85 रुपये कमिशन दिले जाते.एका महिन्याला साधारणपणे 1 ते 2 लाख रुपये इतके कमिशन पेट्रोल पंप चालकांना मिळते.