Close Visit Mhshetkari

Old pension scheme : सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का,जून्या पेन्शन योजनेबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा

OOld Pension Scheme: तुम्ही स्वतःसरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.राज्यांनी ‘जुनी पेन्शन योजना'(Old Pension Scheme) लागू करण्याच्या निर्णयावर सोमवारी लोकसभेत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली.

NPS latest news

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारने जून्या पेन्शन योजनेबाबत मोठी घाेषणा केली.सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले.

कालच 15 व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह (15th Finance Commission Chairman) यांनी नवीन पेन्शन योजनेची वकिली केली आहे.नवी पेन्शन योजना सोडून जुन्या पेन्शन योजनेचा अंगिकार करणे हे घातक असल्याचा दावा त्यांनी केला.त्यांच्या या वक्तव्यामुळे आता वादाला तोंड फुटले आहे.

National pension scheme

जुनी पेन्शन योजना मुळे आर्थिक घडी विस्कटलेली

NPS latest news घेत असल्याचा आरोप सिंह यांनी केला.old pension scheme मुळे अनेक राज्यांची आर्थिक घडी विस्कटून टाकेल,असा इशारा ही त्यांनी दिला होता.गेल्या काही दिवसांत छत्तीसगड,झारखंड,राजस्थान व पंजाब सरकारने आपल्या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली होती.

हे पण पहा --  Old pension scheme : राज्य कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! जुन्या पेन्शन संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय

Old pension scheme new

लोकसभेत त्याला लेखी उत्तर देताना,वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्ट केले.काही राज्यांनी जूनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आपल्या पातळीवर नोटिफिकेशन जारी केलं आहे.अशा परिस्थितीत ‘एनपीएस’चे पैसे परत करण्याची कुठलीही तरतूद नसल्याचे मंत्री कराड यांनी सांगितले. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Leave a Comment