Close Visit Mhshetkari

Old pension scheme : परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने संदर्भात मोठी बातमी! शासन परिपत्रक दि.09/12/2022

Old pension scheme : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी वर्गास नोव्हेंबर 2005 DCPS योजना लागू करण्यात आली आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने (DCPS) तून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करण्याची कार्यपध्दती शासन निर्णय शालेय शिक्षणव क्रीडा विभाग दिनांक 19/09/2019 अन्वये विहीत करण्यात आलेली आहे.

National Pension scheme update

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे.सर्व जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन PRAN क्रमांक सुरू करणे,नियमित कपात करणे कार्यवाही सुरू केली आहे.

परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन कपात केलेली रक्कम संबंधितांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन खात्यावर जमा करणे,चिठठया वाटप करणे परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजने (DCPS) चा हिशोब पूर्ण करणे, रक्कम संबंधितांच्या कायम निवृत्तीवेतन (PRAN) खात्यावर जमा करणे इत्यादी बाबांची कार्यवाही 31 मार्च 2022 पूर्वी करणे होते.सदरील बाबींसाठी मंजूर असलेली तरतूद खर्च करणेबाबतच्या कार्यवाहीबाबत वेळोवेळी क्षेत्रिय कार्यालयांना संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आले होते.

हे पण पहा --  Old pension : जुनी पेन्शन योजना 1982 काय आहे? कर्मचाऱ्याचा जुन्या पेन्शन साठी आग्रह का? पहा OPS चे फायदे ..

Old pension scheme news

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये वर्ग (लेखाशीर्ष ८३४२०२७५) मधील सन २१-२२ मंजूर तरतूद ३२७० कोटी असताना खर्च ४० कोटी झालेला आहे या बाबीसाठी शासनाने संदर्भिय पत्र क्र.8 अर्धशासकीय पत्राव्दारे तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.सदरील हिशोब तात्काळ पूर्ण करणे बाबत कळविलेले आहे.

दिनांक 7/12/2022 रोजी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांचे कर्मचारी कपाती, शासन हिस्सा व त्यावरील व्याजाची परिगणना करुन चिठ्ठया वाटप करुन व सदरची रक्कम संबंधितांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन खात्यावर जमा करणेबाबतची कार्यवाही डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्यात यावी असे निर्देश दिलेले आहेत.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment