Close Visit Mhshetkari

Old pension scheme : जुन्या पेन्शनवर मोठी अपडेट्स,आता रिझर्व्ह बँकेकडून खोडा! जाणून घ्या काय आहे प्रकरण

Old pension scheme : देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याची योजना आखली जात असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मोठी माहिती समोर आली आहे.

Old pension scheme news

जुनी पेन्शन योजने  बाबत देशभरात विविध चर्चा सुरू असताना देशातील अनेक राज्यांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात आली आहे त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन प्रणाली (OPS) लागू करण्याची योजना आखली जात आहे.

या सगळ्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मोठी माहिती  समोर आली आहे. RBI गव्हर्नर म्हणाले की,जुनी पेन्शन योजना (ops) लागू करणाऱ्या सर्व राज्यांना आगामी काळात आर्थिक व्यवस्थापनाचा धोका निर्माण होऊ शकतो.

NPS/DCPS latest updates

देशातील काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना (ops) पुन्हा लागू करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेवर रिझर्व्ह बँकेने मंगळवारी सावधगिरीचा इशारा दिला आहे.यामुळे राज्यांच्या तिजोरीपुढे मोठे संकट निर्माण होऊन संपूर्ण देशभरात राज्याराज्यात वित्तीय तूट निर्माण होईल, अशी भीती शशिकांत दास यांनी व्यक्त केली आहे

हे पण पहा --  Old pension news : आंध्र प्रदेश सरकारने लागु केलेली गॅरंटेड पेन्शन योजना, खरच, हा OPS व NPS मधील सर्वोत्तम मध्यस्थ मार्ग! जाणून घ्या सविस्तर !

Juni pension yojana

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारने जून्या पेन्शन योजनेबाबत मोठी घाेषणा केली.सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना  लागू करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले होते.

यापुर्वी 15 व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह  यांनी नवीन पेन्शन योजनेची  वकिली केली होती.नवी पेन्शन योजना सोडून जुन्या पेन्शन योजनेचा अंगिकार करणे हे घातक असल्याचा दावा त्यांनी केला होता.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment