Old pension : जुनी पेन्शन योजना हा सरकारी कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि जिगरीचा प्रश्न झालेला आहे. सन 2005 नंतर सरकारी नोकरीमध्ये जॉईन झालेल्या कर्मचाऱ्यांना सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केलेल्या आहे.
आता त्याऐवजी आता राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे NPS लागू केलेला आहे.तर या जुन्या पेन्शन योजनेचा हट्ट सरकारी कर्मचारी का करत आहेत त्याचे फायदे काय त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
निवृत्ती वेतन योजना 1982
1982 ची निवृत्त वेतन योजना ही एक शाश्वत योजना असून यामध्ये सरकारी कर्मचाऱ्याला आपल्या शेवटच्या पगाराच्या साधारणपणे 50% वेतन सेवानवृत्त वेतन म्हणून दरमहा मिळत असते.
सोबतच वेळोवेळी सरकारने लागू केलेले वेतन आयोग, महागाई भत्ते याचा सुद्धा समावेश या 1982 च्या निवृत्तीवेतन योजनांमध्ये होत असतो. जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना एका प्रकारे शाश्वत आणि खात्रीशीर योजना असून याचा शेअर मार्केट किंवा अन्य कोणत्याही घटकाशी संबंध नाही.
कर्मचाऱ्यांसाठी ही योजना अतिशय लाभदायक असून या योजनेमुळे आपल्या उतारवयास सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार मिळतो. त्याबरोबर जुन्या पेन्शन योजनेमध्ये खालील गोष्टींचा समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे.
भविष्य निर्वाह निधी (GPF)
1982 निवृत्ती वेतन योजनेमध्ये भविष्य निर्वाह निधी (GPF) ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.जुन्या निवृत्ती वेतन योजनेत भविष्य निर्वाह निधी वर निश्चित दराने व्याज सुध्दा दिले जाते.भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) योजनेत वर्षातून एकदा जमा रक्कमेतून अत्यावश्यक वेळी रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.
सरकारी कर्मचारी मृत्यू नंतर मिळणारे लाभ
कर्मचारी / निवृत्तीवेतन धारक हयात नसताना कुटुंबाला पूर्ण संरक्षण देण्याचे काम 1982 – 1984 च्या फॅमिली पेन्शन योजनेने केले आहे.जुन्या निवृत्ती वेतन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यावर खालील लाभ मिळतो.
अ) कुटुंब निवृत्ती वेतन – सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी व मुलांना सुद्धा या योजनेद्वारे पेन्शन मिळत असते
ब) विकलांग अपत्यास कुटुंब निवृत्ती वेतन – त्याचबरोबर एखादा सरकारी कर्मचारीकर्त्यावर असताना त्या कर्मचाऱ्याला विकलंगाचा आल्यास अशा कुटुंबाला सुद्धा किंवा अपत्य सुद्धा कुटुंब निवृत्ती योजनेचा लाभ मिळतो
क) अंशराशीकरण
ड) उपादान – संपूर्ण सेवा झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीच्या स्वरूपात रक्कम मिळत असते साधारणपणे 14 लाखापर्यंत ही रक्कम असते सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ही सुद्धा रक्कम मिळत असते
इ) भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा असलेली संपूर्ण रक्कमा वारसांना मिळतात.
वेतन आयोग व महागाई भत्ता वाढ
जुन्या पेन्शन योजना चा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे सरकार वेळोवेळी आपल्याला वेतन आयोग लागू करत असते साधारणपणे दर्द वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन होतो यावेळी जुन्या पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना सुद्धा वेतन आयोगाचा लाभ मिळत असतो.
प्रत्येक वेतन आयोगामध्ये महागाई भत्ता म्हणजे डियरनेस अलाउन्स समाविष्ट करण्यात येते तर या हाईकचा फायदा जुन्या पेन्शनधारक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होत असतो म्हणजे वेळोवेळी महागाई भत्ता वाढल्यानंतर नृत्य वेतनात सुद्धा वाढ होत असतेअसते.
निवृत्तीवेतन म्हणजे काय ?
सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर अशा कर्मचाऱ्यांना एकरकमी आणि मासिक पध्दतीने किंवा कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना एकरकमी आणि मासिक पध्दतीने दिली जाणारी रक्कमेस “निवृत्तीवेतन” असे म्हणतात.
निवृत्ती वेतन योजनेत निवृत्ती वेतन, मृत्यु-नि-सेवा निवृत्ती उपदान व कुटुंब निवृत्ती वेतनाचा समावेश होतो. अश्या रकमांचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्रनागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ सध्या अस्तीत्वात आहे.
निवृत्ती वेतन योजना प्रकार
1) नियत वयोमान निवृत्तीवेतन :- ज्यांना नियत वय पुर्ण झाल्यानंतर सेवेतून नियमानुसार निवृत्त होण्याचा हक्क असतो किंवा नियत वयोमान व कर्मचाऱ्याला देण्यात येणारे निवृत्तीवेतन म्हणजे नियत वयमान निवृत्ती वेतन होय.
सहाव्या वेतन आयोगानुसार दिनांक २७/२/२००९ रोजी व त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या तथा होणाऱ्या कर्मचाऱ्यासं अंतीम वेतनाच्या ५०% अथवा मागील १० महीन्यातील सरासरी वेतनाच्या ५०% यापैकी जी रक्कम अधिक असेल ती सेवानिवृत्तीवेतन ठरते.
2) पुर्णसेवा निवृत्ती वेतन :- नियतवयोमानापुर्वी २० किंवा ३० वर्षाची अर्हताकारी सेवा पुर्ण झाल्यावर अथवा वयाची ५०-५५ वर्ष पुर्ण झाल्यानंतर काही कर्मचारी स्वेच्छेने निवृत्त होतात. तर कधी कधी लोकहिताच्या कारणास्तव सक्तीने सेवानिवृत्त केल्या जाते त्यास देण्यात येणारे निवृत्तीवेतन म्हणजे पुर्णसेवा निवृत्ती वेतन होय.
3) रुग्णता निवृत्ती वेतन (Invalid Pension):-
कर्मचाऱ्यांच्या नियतवयोमानपुर्वी मानसिक किंवा शारिरीक विकलांगतेमुळे अथवा कर्मचारी कामाकरिता असमर्थ असल्यास नियम ७२ मध्ये विहीत केलेले वैद्यकीय प्रमाणपत्रा सादर केल्यानंतर कर्मचाऱ्यास सेवानिवृत्त होण्यास परवानगी दिल्या जाते. अश्या कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्तीवेतन देण्यात येते.
4) अनुकंपा निवृत्तीवेतन (Compassionate Pension)
सरकारी कर्मचारी सेवेत असताना त्याच्या गैरवर्तणुक किंवा नादारीबल शासकीय सेवेतुन काढुन टाकल्यास किंवा सेवानिवृत्त होण्यास भाग पाडलेल्या कर्मचाऱ्यास अनुकंपा निवृत्तीवेतन खेरीज कोणतेही निवृत्तीवेतन मंजुर केले जाणार नाही.
5) भरपाई निवृत्तीवेतन :- जर सरकारी कर्मचाऱ्यांना नियत वयमानपुर्वी सेवा निवृत्ती किंवा पूर्ण सेवा निवृत्तीवेतन मिळण्यापुर्वी वैद्यकीय प्रमाणपत्राखेरीज अन्य कारणावरुन आणि त्याची स्वतःची कोणतीही चुक नसतांना कार्यमुक्त करण्यात येते, अशा वेळी देण्यात येणारे निवृत्तीवेतन म्हणजे भरपाई निवृत्तीवेतन म्हणतात.
6) जखम वा इजा निवृत्तीवेतन :- सरकारी सेवेत असतांना अपघात वा आजारी झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवृत्ती वेतनास जखम अथवा इजा निवृत्तीवेतन म्हणतात. नियम ८५ ते ९९ मधील तरतुदीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निश्चित करण्यात येते.
7)असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन: – अपघात किंवा आजारी निवृत्तीवेतनाच्या प्रकरणी एखाद्या कर्मचाऱ्यास मृत्यु आल्यास त्याच्या कुटुबियांना देण्यात येणारे निवृत्ती वेतनास असाधारण निवृत्ती वेतन म्हणतात.
8) कुटुंब निवृत्तीवेतन :- सरकारी कर्मचारी शासकीय सेवेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असतांना मृत्यु आल्यास त्याच्या कुटुबियांना जे निवृत्तीवेतन देण्यात येते त्याला कुटुंब निवृत्तीवेतन असे म्हणतात.
सध्या कुटुंब निवृत्तीवेतनाची गणना अंतीम मुळ वेतनाच्या ३०% दराने परीगणित करण्यात येते.शासकीय कर्मचारी सेवानिवृत्ती नंतर मृत्यु पावला तर कर्मचाऱ्याच्या मृत्युच्या दिनांका नंतरच्या दिनांकापासुन सात वर्षाच्या कालावधीकरिता किंवा मृत सेवानिवृत्त कर्मचारी ज्या दिनांकास वयाची ६५ वर्षे पुर्ण करेल तोपर्यंत त्याच्या कुटुंबीयांना १) अंतीम वेतनाच्या ५०% रक्कम
२) अनुज्ञेय कुटुंब निवृत्तीवेतनाच्या दुप्पट किंवा
३) मंजुर सेवानिवृत्तीवेतन यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम कुटुंब निवृत्तीवेतन मिळते.