Close Visit Mhshetkari

NPS Scheme : खुशखबर …..सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित!

NPS Scheme : धारकांसाठी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडुन दि.27 जानेवारी रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. परिभाषित अंशदान निवृत्ती योजनेत (DCPS amount)जमा रक्कम आणि व्याज रक्कम राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) मध्ये वर्ग करण्यासाठी उर्वरित निधी वितरीत करण्यात येणार आहे.

NPS latest updates

जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 % अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत  समाविष्ट करण्यात आली आहे.

राष्ट्रीय निवृत्ती योजनेत रक्कम होणार वर्ग

जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत वर्ग करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे.

DCPC,NPS Amount Transfer

सन 2021 – 2022 आर्थिक वर्षामध्ये रु.90,61,4780 हजार इतक्या अनुदानापैकी 50 % रक्कम वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली होती.सन 2022 – 2023 आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 21 % निधी वितरीत करण्यास  मंजुरी देण्यात आली होती.

हे पण पहा --  Old pension scheme : जुन्या पेन्शन योजनेविषयी सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सन 2022 – 2023  वर्षासाठी उर्वरित एकूण रु. 17951783 कोटी (एक हजार सातशे एक्याण्णव कोटी सतरा लाख त्र्याण्णव हजार फक्त) इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (BCAMS) द्वारे आयुक्त,शिक्षण,महाराष्ट्र राज्य,पुणे यांना खालील शासन निर्णयानुसार वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Leave a Comment