Nipun Bharat : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन 2020 FLN अध्ययन अभ्यास सर्वेक्षण अंतर्गत भारत सरकारने निपुण भारत अभियानाची अमलबजावणी सुरु केली आहे.त्यासाठी भारत सरकारने निपुण भारत अभियानाची अमलबजावणी सुरु केली आहे.
महाराष्ट्र निपूण भारत अभियान
निपूण भारत अभियाना अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यानि इयत्ता तिसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक क्षमता सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.सदर लक्ष्य गाठण्यासाठी इयता व अध्ययन निष्पत्तीनिहाय निर्धारित करण्यात आलेले आहेत.यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने दिदि.27 ऑक्टोबर 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.या शासन निर्णयानुसार “महाराष्ट्रात निपुण भारत अभियान” ची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण
निपुण भारत अभियानाच्या लक्ष्यपूर्तीसाठी विद्यार्थ्यांच्या संपादणूकीच्या सध्य स्थितीची वेळोवेळी पडताळणी होणे आवश्यक आहे.या करिता राज्यस्तरावरून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इयता दुसरी ते पाचवीसाठी ‘निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण’ करण्यात येत आहे.
FLN अध्ययन अभ्यास सर्वेक्षण
प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त / संपादित केलेल्या जाहेत हे पडताळणे व त्यानुसार शिक्षकांनी उपचारात्मक अध्यापन करणे.हे (FLN अध्ययन अभ्यास सर्वेक्षण) करण्याचे उद्दिष्ट आहे