Mudra Loan : भारतातील असंख्य बेरोजगार,होतकरू युवक,युवतींसाठी केन्द्र सरकारने महत्वकांक्षी पंतप्रधान मुद्रा लोन योजना सुरू केली होती.त्यानूसार अनेकांनी या योजनेचा लाभ घेत कर्ज घेतले आहे.त्यासाठी ग्राहकांना आतापर्यंत बॅंकेत अर्ज करावा लागत असे.कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सहज लोन मिळत असे.आज आपण पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेचे स्वरूप,निकष व अर्ज करण्याची पद्धत याची सगळी माहिती या लेखात पाहणार आहोत.
Mudra Loan Yojana
आनंदाची गोष्ट म्हणजे देशातील अग्रगण्य बॅंक SBI ने आपल्या खातेधारकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत SBI e-Mudra Loan सुविधा सुरू करून दिली आहे.ज्यांना सूक्ष्म उद्योग सुरू करण्यास इच्छा आहे,ते या योजनेंतर्गत,50 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात.या कर्जाची परतफेड करण्यासाठी 60 महिन्यांची मुदत दिलली जाईल.कर्जाची परतफेड 9 % व्याज दरासह 3 महिन्यांच्या स्थगित कालावधीनंतर सुरू होईल.
मुद्रा लोन योजना (PMMY)
मुद्रा लोन योजना काय आहे ?
मुद्रा लोन (PMMY) हा प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा ( PMML) एक भाग आहे. या योजनेची सुरवात 8 एप्रिल 2015 रोजी मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी केली.या योजनेंतर्गत कृषी क्षेत्रासह उत्पादन,व्यापार आणि सेवा क्षेत्रातील सूक्ष्म उद्योग/युनिट्सना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
ज्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खातेधारकांना मायक्रो एंटरप्रायझेस (MSME) वैयक्तिक सुरू करायचे आहे त्यांना ई- मुद्रा कर्ज दिले जाईल.अनेक लोक ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण ते पैशाअभावी करू शकत नाहीत.या लोकांसाठी हि योजना फायद्याची ठरणार आहे.
मुद्रा योजना ( mudra loan) पात्रता व निकष
1)व्यक्ती भारताची रहिवासी असावी आणि तिचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.
2) मोबाइल क्रमांक लिंक असलेले आधार बँकेशी जोडला गेलेले पाहिजे.
3) बचत / चालू खाते सांभाळणारे विद्यमान वैयक्तिक ग्राहक ई- मुद्रा डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी अर्ज करू शकतात.
4) यापूर्वी कोणतेही SME कर्ज घेतलेले नसावे.
5) अर्जदाराने शिशूसाठी मुद्रा स्कोअरिंग कार्डमध्ये किमान 50 % गुण प्राप्त केलेले असावेत.