Close Visit Mhshetkari

आता घरबसल्या करा वारस नोंद,असा ऑनलाईन अर्ज MP Land record

MP land records :  शेत जमिनीवर  वारसांची नोंद कशी करावी,हे माहीत असणे गरजेचे आहे.आता जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाइन अर्जही करता येतो.ऑनलाइन अर्ज कसा व कुठे करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्रे, त्याची प्रक्रिया काय आहे? याबाबत जाणून घ्या.

mp Land record
mp Land record

ऑनलाईन वारस हक्क नोंद

ग्रामीण भागातील वंशपरांगत शेतजमीन किंवा मालकी हक्क ज्याच्या नावावर आहे ती शेतजमीन मूळ मालकाच्या मृत्यनंतर त्याच्या वारसदारांना त्या जमिनीवर वारसदार म्हणून नोंदणी कशी करायची, याबाबत अनभिज्ञता दिसून येते. प्रसंगी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवणे सुरू होते. मात्र शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचे हक्क मिळू शकतात.

“ऑनलाईन वारस हक्क नोंद” पध्दत पुढील प्रमाणे आहे.

१. एखादा खातेदार मयत झाल्यास ३ महिन्यांच्या आत वारस नोंदणी करिता अर्ज देणे अपेक्षित असते.

२.अर्ज देते वेळी मयत खातेदार किती तारखेस मयत झाला आहे.त्याच्या नावावर कोणकोणत्या गटातील किती क्षेत्र आहे. व मयत खातेदारास एकूण किती जण वारस आहे. याची माहिती असते.

३.अर्जासोबत मयत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला,त्याचे नावावरील जमिनीचे ८ अ चे उतारे सर्व वारसांचे पत्ते वारसाचे मयत व्यक्ति बरोबर असलेले नाते व शपतेवरील प्रतिज्ञा पत्र सादर केले पाहिजे.

४.नोंदी घेत असताना व्यक्तीचा जो धर्म आहे त्या कायद्यानुसार होतात.हिंदू व्याकीच्या बाबत हिंदू तर मुस्लिम व्यक्तीच्या बाबत मुस्लिम वारस कायद्याचे नियम पाळले जातात.

वारस नोंद आवश्यक कागदपत्रे

>> सर्व प्रथम मयत खातेदाराचा मृत्यू दाखला वारसांनी काढावा.मृत्यू नंतर ३ महिन्याच्या आत सर्व वारसांची नवे नमूद करून वारस नोंदीसाठी अर्ज सादर करावा.(वारस नोंद आवश्यक कागदपत्रे)

>> विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टॅम्प लावलेला अर्ज व शपथ पत्र व मृत्युपत्र.

>> तलाठी/ मंडळ अहवाल

>> शासकीय नोकरी नसल्यास पुरावा उदा. सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा

>> रेशन कार्डची प्रत

>> मृत खातेदार पेन्शन धारक असल्यास कोणत्या महिन्यापर्यंत शेवटची पेन्शन उचलली त्या पानाची प्रत.

>> ग्रामपंचायत/ नगरपालिका यांच्या जन्म-मृत्यूच्या नोंदवहीतील उतारा

>> वारसा हक्क प्रमाणपत्र व नॉमिनी( वारसा हक्क व नॉमिनी हे वेगळे असतात) बँक, विमा रक्कम इत्यादी बाबत नॉमिनी म्हणजे मृत्यूनंतर संबंधित खातेदाराचे रक्कम ज्या व्यक्तीकडे जाते किंवा देण्यात यावी असे नमूद केलेले नाव त्यालाच ती मिळते.

>> वारसा हक्क प्रमाणपत्र व्यक्तीच्या व संबंधित व्यक्तीच्या संपत्तीवर वारस नोंद वहिवाट इत्यादी बाबींसाठी महत्त्वाचे असते.

हे पण पहा --  Bhoomi Land Records : आता फक्त १०० रुपयांत करा शेत जमीन नावावर! पहा सर्व प्रोसेस ...

7/12 च्या संदर्भात महत्वाचे मुद्दे

• आपल्या नावावर असणाऱ्या प्रत्येक स्वतंत्र गटासाठी एक 7/12 उतारा असतो.

• आपल्या नावावर असणाऱ्या सर्व गटांच्या 7/12 प्रमाणे 8अ वर एकत्रित नोंद असते, त्यामुळे सर्व गटांचे 7/12 व 8अ यांची तुलना करुन पहा.

• 7/12 वर इतर हक्कात कोणत्या नोंदी आहेत हे काळजीपूर्वक पहा. कर्ज, तगाई यांची रक्कम व कर्ज

• देणाऱ्या संस्थेचे नाव बरोबर असल्याची खात्री करावी.

• शेतात असणाऱ्या विहिरींची किंवा बोअरवेलच्या नोंदी त्या-त्या 7/12 उताऱ्यावर “पाणी पुरवठ्याचे साधन” या रकान्याखाली करुन घ्या.

• सर्व फळझाडांच्या नोंदी नमुना बारा मध्ये “शेरा” रकान्यात करुन घ्या.

• कोणतीही फेरफार नोंद मंजूर झाली असेल तर लगेचच 7/12 वर या नोंदीचा अंमल घेतला जातो.

जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

•• हा अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

•• या पेजवर तुम्हाला खालच्या बाजूला एक सूचना दिसेल -“७/१२ दुरुस्तीसाठी ई हक्क प्रणाली”, अशी ही सूचना असून त्याखाली एक लिंक दिलेली आहे.

•• https://pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

•• त्यानंतर तुमच्यासमोर ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ नावानं एक पेज ओपन होईल.

•• यावरील ‘Proceed to login’ या पर्यायावर क्लिक केलं की तिथं तुम्हाला आधी तुमचं अकाऊंट सुरू करायचं आहे. त्यासाठी ‘Create new user’ यावर क्लिक करायचं आहे.

••  ‘New User Sign Up’ नावाची नवीन पेज उघडेलत्यानंतर Address Details मध्ये घर क्रमांक आणि गल्लीचं नाव किंवा घरावर काही नाव असेल तर ते टाकू शकता

•• सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे. इथे असणारे आकडे किंवा अक्षरं जशीच्या तशी पुढच्या कप्प्यात लिहायची आहे, आणि मग सेव्ह बटन दाबायचे आहे.

•• त्यानंतर या पेजवर खाली ‘Registration Successful. Please Remember Username & Password for Future Transaction.’ असा लाल अक्षरातला मेसेज तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला ‘Back’ या पर्यायावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करायचं आहे. आता आपण नोंदणी करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग-इन म्हणायचं आहे.

•• शेवटी ‘Details’ नावाचे एक पेज तुमच्यासमोर उघडेल. इथं Registration, Marriage, e-filing, 7/12 mutations असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील. याचा अर्थ इथे तुम्हाला या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment