Close Visit Mhshetkari

Mahavitaran Recruitment : ‘आयटीआय’ उमेदवारांसाठी सुवर्ण संधी महावितण मध्ये होणार भरती प्रक्रिया.. घ्या जाणून सविस्तर माहिती !

Mahavitaran Recruitment : नमस्कार नोकरी विषयक माहितीसाठी आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी लिमिटेड हिंगोली यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून या भरतीद्वारे अप्रेंटिस पदाच्या जागा भरणारे भरण्यात येणार आहे.

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून 11 जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे भरती विषयक संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत बघा

Maharashtra State Electricity Distribution  

आयटीआय उत्तीर्ण झालेल्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असणारा आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड हिंगोली यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या भरतीद्वारे अप्रेंटीस म्हणजे शिकाऊ प्रशिक्षणाची पदाच्या एकूण 80 जागा भरण्यात येणार आहेत.

राज्य वीज वितरण कंपनी भरती 2024 मधील पदे  

  1. पदाचे नाव – अप्रेंटीस/ शिकाऊ प्रशिक्षणार्थी
  2. वीजतंत्री विभाग – ४० जागा
  3. तारतंत्री विभाग – ४० जागा
  4. एकूण रिक्त पदसंख्या – ८० जागा
हे पण पहा --  Smart Meter : आता या वीज ग्राहकांच्या घरी लागणार स्मार्ट मीटर ! किंमत असणार तब्बल ..
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवार संबधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असावा.

अर्ज प्रक्रिया कशी असणार 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ११ जानेवारी २०२४ आधी सादर करावा.

उशिरा भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची मूळ आणि छायांकित प्रत घेऊन उमेदवारांनी १५ जानेवारी रोजी अर्ज पडताळणी साठी विद्युत भवन मंडळ कार्यालय, हिंगोली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे

 आवश्यक कागदपत्रे
  • ऑनलाइन अर्जाची मूळ प्रत
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्रे
  • जातीचे प्रमाणपत्र 
  • ओळखपत्र आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इ.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
  1. महावितरण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. “भरती” टॅबवर क्लिक करा.
  3. “इलेक्ट्रिशियन” भरतीसाठीच्या जाहिरातीत क्लिक करा.
  4. “ऑनलाइन अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
  5. आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment