Maharashtra Rain : अरबी समुद्राच्या कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पावसाचा जोर वाढला आहे. किनारपट्टीसह जिल्ह्याच्या काही भागाला पावसाने झोडपून काढले असून, वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे.दरम्यान, कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढील तीन-चार दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटी चांगला पाऊस
सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होत आहे.अजून राज्यात दोन दिवस पाऊस असणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.महाराष्ट्रात गुरुवारी बहुतांश राज्यात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरण पाणलोटात पावसाची मोठी आवक झाली.मुंबई, पुणे,नाशिक,नगर,विदर्भातील बहुतांश धरणे भरत आली आहेत.
काल विदर्भ,कोकण,मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला.सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून धुळे व नंदुरबार जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
IMD Weather forecast updates
पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज व्यक्त करत IMD ने दिलेल्या माहितीनुसार 1 ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या काही भागांमध्ये मध्यम तर, काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, त्यानंतर पुढील दोन दिवसांसाठी भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, गडचिरोली, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी,लातूर,नांदेड, हिंगोली जिल्ह्यासह विदर्भातील अमरावती, भंडारा, बुलढाणा,अकोला, नागपूर,वर्धा,यवतमाळ,वाशिम जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह मध्यम पावसाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस येत असून अहमदनगर,सोलापूर, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.