Mahadbt Portal : नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे आनंदाची बातमी समोर आलेली असून, एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत सन 2023 -24 सालासाठी अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विविध योजनांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
महाडीबीटी पोर्टल ऑनलाईन अर्ज
एकात्मिक फलोत्पादन विकास योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कांदाचाळ,शेततळे अस्तरीकरण,हरितगृह, शेडनेटगृह, फलोत्पादन यांत्रिकीकरण, सामुहिक शेततळे, अहिल्याबाई होळकर रोपवाटिका, द्राक्ष प्लॅस्टिक कव्हर तंत्रज्ञान इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत.
शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.त्यासाठी सरकारने हे अधिकृत संकेतस्थळ दिले आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या http://mahadbtmahait.gov.in या संकेस्थळावर अर्ज सादर करावेत, असे अवाहन नाशिक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.
Farmer scheme Maharashtra
महाडीबीटी पोर्टल योजनेतील लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी सातबारा आठ आधार कार्ड बँक पासबुक तसेच जातीचा दाखला संकेतस्थळावरती अपलोड करावा लागणार आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी अशी माहिती देण्यात आली आहे.
महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर स्वत:ची नोंदणी करावी. सदरील योजने संदर्भात अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी व CSC केंद्रावर संपर्क साधावा, असेही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी कळविले आहे.
ठिबक/ तुषार सूक्ष्म सिंचन योजना
नाशिक जिल्ह्यात 2023-24 सालासाठी R.K.V.Y प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविण्यात येत आहे. सदरील योजनेंतर्गत44 अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थींना मार्गदर्शक सूचनेनुसार 55 % व बहुभूधारक शेतकऱ्यांना 45 % अनुदान देय आहे.
महाडीबीटी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?