Close Visit Mhshetkari

‘मागेल त्याला शेततळे’ योजना पुन्हा सुरु ; मिळवा 75 हजारापर्यंत अनुदान,असा करा अर्ज | Magel Tyala Shettale

Magel Tyala Shettale : फडणवीस सरकारच्या काळात सर्वात लोकप्रिय ठरलेली ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना ठाकरे सरकार आल्याने दुर्लक्षित होऊ लागली होती.राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शेततळ्याला नव्याने मंजुरी देणे बंद व अनुदानही टप्प्या-टप्प्याने व विलंबाने येऊ लागले होते.

पण आता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2022 – 23 या योजनेअंतर्गत या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा विस्तार करून त्यामध्ये वैयक्तिक शेततळ्याचा समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Magel tyala shettale
Magel tyala shettale

Magel Tyala Shettale

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना यायोजने अंतर्गत विस्तार करून त्यामध्ये वैयक्तिक शेततळ्याचा समावेश करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतला आहे.
यापूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेत शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या 50 हजार रुपयांच्या अनुदानात 50% वाढ करून या योजनेत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या आकारमानाच्या वैयक्तिक शेततळ्यासाठी शासनाने निश्चित केलेला खर्चाच्या मापदंडा एवढे किंवा 75 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी,पिकांच्या शाश्वत उत्पादनाची व हमखास आर्थिक उत्पन्नाची खात्री मिळावी या दृष्टीने वित्तमंत्र्यांनी सन 2022-23 च्या अर्थसंकल्पीय भाषणात ही घोषणा केली होती. त्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली असून यासाठी अर्ज कसा, कुठे करायचा / याबाबत आवश्यक काय कागदपत्रे लागतील याबद्दल त्यांना काही माहिती नसते त्यामुळे हे अनुदान त्यांच्यापर्यंत पोहचत नाही.आज आपण या शेततळ्याच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज / कागदपत्रे / पात्रता / लाभ / याबद्दलची सर्व माहिती या लेखात पाहणार आहोत.

शेततळे अनुदान योजना कागदपत्रे

>> 7/12 व 8A

>> बँक पास बुक

>> आधार कार्ड

>> परिक्षण अहवाल

>> जातीचा दाखला

>> पासपोर्ट फोटो

शेततळे अनुदान योजना पात्रता

• योजनेसाठी पात्रता या योजनेचा लाभ फक्त शेतकरीच घेऊ शकतो.

• अर्जदाराच्या नावावर कमीत – कमी 1 एकर जमीन असणे आवश्यक.

• ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेताचा 7/12 आणि 8-अ असावा.

• लाभार्थी शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास, प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

शेत तळ्यासाठी मिळणारे अनुदान

‘शेत तळ्यासाठी मिळणारे अनुदान’ किती असते पहा

30X30X3 मीटर आकारमानाच्या शेत तळ्यासाठी 75 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळेल.

15X15X3 मीटर आकारमानाच्या शेत तळ्यासाठी 35 ते 50 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळेल.

20X15X3 आकारमानाच्या शेततळ्यासाठी ही 50 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळेल.

असा करा शेत तळ्यासाठी ऑनलाईन अर्ज

‘असा करा शेत तळ्यासाठी ऑनलाईन अर्ज’

1) सर्व प्रथम ‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजेच Mahadbt portal वर आपला Users ID आणि Password किंवा आपला आधार कार्ड आणि otp टाकून लॉगिन करावे.

2) होम पेज वर क्लिक केल्यानंतर ऑप्शनमध्ये ‘अर्ज करा’ यावर क्लिक करावे.

3) ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 7 ऑप्शन दिसतील त्यानंतर ‘सिंचन साधने व सुविधा’हा पर्याय निवडा.

4) यानंतर तुम्हाला success दाखवले जाईल यावर तुम्ही OK वर क्लिक करा.

5) यानंतर तुम्हाला सिंचन स्रोत निवडावा लागेल,यामध्ये तुमच्याकडे कोणतं सिंचन स्रोत आहे ते निवडा, जसे की, उपसा सिंचन / कूपनलिका / कालवा / शेततळे / विहीर / शेततळे / यापैकी तुम्ही सिंचन स्रोत निवडा…

6) यानंतर तुम्हाला ऊर्जा स्रोत निवडावा लागेल.वीज कनेक्शन / सौर ऊर्जा चलित पपं / डिझेल चलित पपं यापैकी एक ऊर्जा स्रोत निवडा.

7) यानंतर तुम्हाला ‘सिंचन सुविधा व उपकरणे’ मध्ये इंजिन / इलेक्ट्रिक मोटार -सिंचन पपं / उपसा सिंचन / ठिबक / तुषार / यापैकी एक पर्याय निवडा.

8) यानंतर तुम्ही वापरात असलेलं उपकरण किती HP चे आहे त्याचा पर्याय निवडा.

9) यानंतर तुम्हाला वरिल माहिती successfully ऍड झालेली दिसेल.

10) यानंतर तुम्हाला पुन्हा मुख्यपृष्ठावर जावं लागेल.मुख्यपृष्ठावर जणू पुन्हा अर्ज करा वर क्लिक करा. ‘सिंचन साधने व सुविधा’ या ऑप्शनवर क्लिक करा.

11) यावर क्लिक केल्यानंतर आता पुन्हा अर्ज खुलेल.

12) यानंतर आपल्या प्रोफाईलची स्थिती दाखवली जाईल.यात वैयक्तिक तपशील आणि इतर सर्व माहिती व्यवस्थित भरावी जसे की, तालुका, गट/ सर्व्हे नंबर मुख्य घटक तपशील मध्ये ‘सिंचन साधने व सुविधा‘ निवडा, यानंतर बाब निवडामध्ये ‘वैयक्तिक शेततळे’ यावर क्लिक करा.

13) यानंतर ‘साईझ निवडा’ 30X30X3 / 15X15X3 / 20X15X3 यापैकी एक ऑप्शन निवडून save करा.

14) त्यानंतर तुम्हाला पुन्हा मुख्यपृष्ठ दाखवलं जाईल.आता पुन्हा तुम्हाला उजव्या बाजूला ‘अर्ज सादर करा’ ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्या ऑप्शनला क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येईल ते ok वर क्लिक करावे लागेल. एकदा ok वर क्लिक केल्यानंतर अर्ज मध्ये बदल करू शकत नाही,बदल करायचा असेल तर पूर्ण अर्ज रद्द करावा लागतो. त्यामुळे अर्ज काळजीपूर्वक भरा.

15) यानंतर तुम्हाला ‘show’ या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्ही ज्या योजनांसाठी अर्ज केला असेल ते सगळे अर्ज दिसेल त्याला प्राधान्य क्रम द्या.शेवटी‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक करावे

16) क्लिक केल्या नंतर पुढे आपण दुसऱ्या पेज वर redirect होऊ. या पेज वर आपणाला make payment चे ऑपशन दाखवला जाईल. इथे आपणास 23.60 रुपयांचे payment करावे लागते.

17) Payment करण्यासाठी आपणाला बरेच ऑपशन दाखवले जातात UPI,Wallet ,net banking,IMPS यापैकी आपल्याला ज्या प्रकारे payment करायची आहे ते ऑपशन निवडून तुम्ही payment करू शकता.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment