Close Visit Mhshetkari

land record : आपल्या जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करणारे हे 8 पुरावे माहीत आहेत का ? पहा यादी

land record : जमिनीच्या मालकी हक्काविषयी अनेकदा वाद निर्माण होत असते, अशावेळी संबंधित जमीन ही आपल्याच मालकिची आहे,हे सिद्ध करण्यासाठी जमिनीसंबंधीचे काही पुरावे कायमस्वरुपी जतन करुन ठेवणे आवश्यक असते. आता हे पुरावे नेमके कोणते आहेत ? याचीच माहिती आता आपण या लेखात पाहणार आहोत.

Old Land record

सातबारा उतारा :- आपल्या जमिनीचा सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे. जमिनीवर खातेदाराचा किती अधिकार आहे? याची सर्व यामध्ये नमूद केलेले असते.

खरेदी खत :- जमिन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी महत्वाचा दस्त आहे. जमिनीची रजिस्ट्री जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जातो.

खाते उतारा किंवा 8-अ :- वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असते.यामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर असलेली एकूण जमीन पाहता येते.

फेरफार उतारा (Mutation Utara) : – फेरफार उतारा हा महत्त्वाचा महसूल पुरावा आहे.फेरफार नोंदीवर जमीन खरेदी केलेल्या दिनांक, घेणार, देणार, व्यवहार झालेली रक्कम इ नोंदी असताना.फेरफार उतारा आपल्याकडे जपून ठेवावा.

हे पण पहा --  Land records : जमीन बक्षीसपत्र म्हणजे काय!? बक्षीसपत्र कसे करायचे? एकाच क्लिकवर वाचा सर्व माहिती

Digital land record

जमीन भू – नकाशा : – जमिनीच्या मोजणीचे नकाशे तुमच्याकडे असल्यास तुमचा त्या जमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करता येऊ शकतो.

महसूलाच्या पावत्या :- जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्यांमार्फत दिली जाणारी पावती,हासुद्धा जमिनीच्या मालकी हक्काबाबत महत्तावाचा पुरावा ठरू शकतो.पिक विमा भरलेल्या पावत्या,पिक कर्ज इ.पुरावे पण महत्त्वाचे असतात.

जमिनीसंबंधी खटले :- जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला चालला असेल तर अशा केसची कागदपत्रे, त्यातील जबाबाच्या प्रती,निकाल पत्र इत्यादी कागदपत्रे जपून ठेवावी.

प्रॉपर्टी कार्ड ( Property card) :- बिगरशेतजमिनीवर मालमत्तेच्या हक्काविषयी माहिती सांगणारा सरकारी कागद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड जपून ठेवणे आवश्यक असते.

1 thought on “land record : आपल्या जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करणारे हे 8 पुरावे माहीत आहेत का ? पहा यादी”

  1. आपण जमिनीच्या मालकी हक्क अधिकार बाबत जे काही सांगितले ते सर्व काही चुकीचे आहे.
    १) आपण स्वतः ७/१२ पाहिलं आहे का?
    २) आपण स्वतः ७/१२ चे सर्व कॉलम चाचपून बघितलं आहे का?
    ३) आपण ७/१२ ची व्याख्या जाणता का हो?
    ४) ७/१२ हा कधी पर्यंत मालकी दाखवत होता? व कधी पासून मालकी हक्क अधिकार भ्रष्ट राजकारणी सरकारने शेतकऱ्यांच्या नाका खालून काढून घेतले हे आपणास माहिती आहे का?
    ५) भ्रष्ट राजकारणी सरकारने शेतकऱ्यांच्या ७/१२ मध्ये कोण कोणते कॉलम कधी कधी बदल्लेत हे आपण लक्ष देऊन बारकाईने निरीक्षण केले आहे का?
    ६) आपण आगोदर स्वतः चे ७/१२ आपल्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा व असेच आपल्या पिढ्यान् पिढ्या चे ७/१२ काढून नीट लक्ष्य देऊन बारकाईने निरीक्षण करत सर्व चे सर्व कॉलम चाचपून बघितलं पाहिजे, तद्नंतर आपण ७/१२ हे मालकी हक्क अधिकार दाखविणारे किंवा सिद्ध करणारे दस्तावेज आहे की नाही हे लोकांना सांगावे.
    ७) साहेब माझे शब्द आपणास योग्य वाटणार नाहीत मला माहित आहे म्हणून मी आपणास आगोदरच माफी मागतो, मात्र आपण माहिती अपुरी घेऊन लेख लिहलंय हे आपणास लक्ष्यात आणून देणे गरजेचे होते म्हणून हे असे लिहावं लागले.
    ८) साहेब ह्या भ्रष्ट राजकारणी सरकारने शेतकऱ्यांच्या मालकी हक्क अधिकार स्वतः च्या अर्थात सरकारी फायद्या साठी कधीच काढून घेतले आहे.
    ९) आपण स्वतः ७/१२ चे सर्व कॉलम चाचपून बघितलं आणि निरीक्षण केले तर आपणास लक्षात येईल.
    १०) आपण एके काळी मालक होता आता भोगवटदार अर्थात (strangers) झालं आहात..
    ११) शासनाने कार्बन क्रेडिट चे पैसे लाटण्या साठी आपले मालकी हक्क अधिकार संपुषटात आणून दशक नसून दशके झाली आणि आपण आज पण स्वतः ला जमिनीचे मालक समजत आहात आश्चर्य वाटते.
    १२) आज तागायत एकही शेतकरी संघटनेने सदर विषयी साधे विधान कधी आपल्या ना नफा ना तोटा देणारे तोंडी ह्या विषयी बोलताना दिसले नाही.
    १३) आपण आता मालक नाही भोगवटदार आहात….. त्या मुळे मालकी हक्क अधिकार सिद्ध करणारे दस्तावेज मध्ये ७/१२ चे समावेश करायचा बंद करा…. एक दिवस एईल आपल्या नंतर च्या पिढीला हे शासन करते जमिनी वरून बेदखल करतील म्हणून आपण कोणती चळवळ सुरू करायला हवी ते पहा… कोणाच्या मागे लागलं तर हा जाणता राजा शेतकरी मालकी हक्क अधिकार सिद्ध करुशकेल बघा…. मी मालकी हक्क अधिकार मिळविण्या साठी गेले २७ वर्षे भ्रष्ट सरकार विरोधात लढून काही हद्दी पर्यंत यश मिळवायचा प्रयत्न केले आहे….बघू आम्ही आमच्या पूर्वजांनी सांभाळून ठेवलेले जमिनींना कुठं पर्यंत मालकी म्हणून ठेऊ शकतो…
    माझे शब्द आपणास दुखवले असतील तर मला माफ करा हि विनंती..
    आपलं लहान भाऊ..

    Reply

Leave a Comment