Close Visit Mhshetkari

आपण खरेदी केलेल्या मालमत्तेची घरबसल्या करता येणार फेरफार नोंद! पहा सोपी पध्दत : land record

Land record : शेतकऱ्यांना आता 9 सेवा घरी बसल्या ऑनलाईन मिळणार आहेत.या सेवांचा आपल्याला मोठा फायदा होणार आहे कारण की आपला वेळ पण वाचणार आहे.

ऑनलाईन ई फेरफार नोंद महाराष्ट्र

सामान्य शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यात अतिशय क्लिष्ट वाटणारी फेरफार नोंदीची प्रक्रीया आता शासनाच्या नव्या ई हक्क प्रणालीमुळे अधिक सोपी झाली आहे.आता फेरफार नोंदीसाठी घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे.

आजवर सुमारे २० हजार जणांनी या प्रणालीद्वारे अर्ज दाखल केल्याची माहिती राज्याचे ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.(ऑनलाईन ई फेरफार नोंद महाराष्ट्र)

Online Land record

शेतकऱ्याला अगोदर सर्वात PDE खात नोंदणी करावे लागतील त्यानंतर आपल्याला जी सेवा ऑनलाईन हवे आहे, त्या सेवेला निवडावे लागेल.ज्या सेवेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. सेवा निवडल्यानंतर त्यासाठी लागणारी कोण कोणती कागदपत्रे ‘Online Land record’ आहेत त्याची माहिती दिसेल.

फेरफार नोंद (Ferfar Nondani)

 शासनाने ई- हक्क प्रणाली ही एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे कोणत्याही सामान्य माणसाला जमीन खरेदी केल्यानंतर किंवा घरातील कर्ता पुरुष मयत झाल्यानंतर त्याची वारस नोंद अथवा कर्जानंतर बोजाची अथवा कर्जफेडीनंतर बोजा कमी केल्याची नोंद असो, प्रत्येक वेळी तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावे लागतात. यापूर्वी या क्लिष्ट कामात सर्वसामान्यांना त्रास व वेळही जात होता.

Digital land record

महसूल खात्याच्या ऑनलाइन  9 सेवांचा आपण घरी बसून ऑनलाइन पद्धतीने लाभ घेऊ शकतो.

1. इ करार नोंदी

2. अपाक शेरा कमी करणे

3. विश्वास्त चे नाव बदलणे

4. सातबारा चूक दुरुस्त करणे

5. मृताचे नाव कमी करणे

6. बोजा चढविणे,

7. गहाणखत

8. वारसा नोंद करणे

9. एकत्र कुटुंब  करता नोद कमी करणे.

वादग्रस्त फेरफार नोंदीची पध्दत

• मालकी हक्क हस्तांतरणाबाबत फेरफार मध्ये ज्यांचा संबध येत असेल व त्यांना जर नोंदीवर हरकत असेल तर ते तोंडी अथवा लेखी स्वरूपात हरकत घेऊ शकतात. वादग्रस्त नोंदी या वेगळ्या नोंदवहीत ठेवणे तलाठ्याला बंधनकारक आहे तसेच

हे पण पहा --  Land Records अतिक्रमण केलेली जमीन परत मिळणार फक्त 2 दिवसात

• अशा स्वरूपातील प्राप्त हरकतीस तात्काळ पोच देणे सुध्दा बंधनकारक आहे.

• वादग्रस्त प्रकरणात म्हणजेच ज्या प्रकरणात हरकत प्राप्त झाल्या आहेत अशा प्रकरणात संबंधीत अधिकाऱ्याने अथवा भूमापन अधिकाऱ्याने सहा महिन्यांच्या आत निर्णय घ्यायचा असतो.

• वादग्रस्त फेरफारची नोंद फेरफार वहीत संबंधित नोंदी पुढे दिलेल्या निर्णयाचा उल्लेख करून नोंद कायम

• अथवा हरकत ग्राह्य असेल तर नोंद रद्द करावयाची असते.

• नोंद प्रमाणित झाल्यानंतरच त्याची नोंद गाव नमुना क्र. 07 म्हणजे सात-बारा उताऱ्यामंधील नमुन नंबर 07 वरती घेतली जाते.

• नमुना क्रमांक 07 मंध्ये आळे करून जुन्या हक्कधारकाच्या नावावर कंस करून नवीन हक्कधारकाचे नाव हक्क तपशिलासह नोंदविले जाते.

Ferfar Nondani नोंदीबाबत घ्यावयाची दक्षता

1. तलाठ्यास गाव नमुना क्रमांक 06 ड वरती हक्क नोंद घेण्याशिवाय कोणताही इतर अधिकार नाहि,

2. फेरफार नोंदवही वरती नोंद करणे हि प्राथमिक सुरूवात आहे..

3. सदर फेरफार नोंदवहीत नोंद घेतल्याची नोटीस गावच्या चावडीवर व आता नवीन स्वरूपातील ई चावडीवर लावणे

4. महसूल कायदा कलम 150 (2) नुसार आवश्यक करण्यात आलेले आहे. सदर फेरफार नोंदी मंडळ अधिकाऱ्याकडून तपासल्या जातात.

5. मंडळ अधिकारी त्यासंबंधीचे सादर केलेले दस्त व विविध आदेशांची खात्री करून घेतात. आवश्यकता भासल्यास चौकशी सुध्दा करतात.

6. महसूल अभिलेख नोंदवह्या सुस्थितील ठेवणे ही जबाबदारी नियमावली 1971 मधील नियम क्रमांक 5 (3) नुसार मंडळ अधिकाऱ्याची असते.

7. फेरफार नोंदवहीतील नोंदी मधे कोणतीही खाडाखोड ग्राह्य धरली

जात नाही तरीसुध्दा खाडाखोड झाल्या

8. मंडळ अधिकारी खाडाखोड बाबत सही करून प्रमाणित करतो. असे मंडळ अधिकाऱ्याला करणे

9. महसूल नियमावली नियम क्रमांक 5 (5) नुसार आवश्यक

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment