Close Visit Mhshetkari

Lalya Disease On Cotton : कपाशीवरील लाल्या रोग कारणे आणि उपाय

Lalya Disease in Cotton : महाराष्ट्रातील विदर्भ,मराठवाडा खान्देश भागात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली जाते.सध्या कपाशीवर थ्रिप्स,बोंडअळी, बोंडात चालू असताना आता कपाशी वर लाल्या रोगचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे. आता याची कारणे व उपाय आपण या लेखात पाहणार आहोत.

कपाशीतील लाल्या रोग

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना माहितीच आहे,कापशी सारख्या पिकाला जास्त नुकसान देणारा रोग म्हणजे लाल्या रोग.या रोगांमुळे कापशी च्या झाडाची सर्व पाने लाल पडून हे गळायला सुरवात होते.कालांतराने पूर्ण झाड हे सुकून जाते.जर आपण या रोगाचे वेळीच नियंत्रण नाही केले तर,आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होईल.हा रोग आला तर संपूर्ण शेतातील कपाशी पिकाला घेऊन बसतो.

लाल्या रोगाची मुख्य करणे

1. शेतकरी आपल्या शेतामध्ये वारंवार एकाच पीक घेत असतो त्या मुळे जमिनीतील सुपीकता कमी होते म्हणजेच जर आपण आपल्या शेतात कापशी वर परत दुसरे पीक पण कापशी घेत असाल तर हा लाल्या रोग होऊ शकतो.

2.कापशी पीक लावण्याआधी जर त्या जमिनीमध्ये असे पीक घेतले असेल,की ज्या पिकाला जमिनीतील अन्नद्रव्ये खूप जास्त प्रमाणात लागतात.उदा.केळी किंवा ऊस हे पीक लावले असेल तर हा लाल्या रोग तुमच्या कपाशीच्या लागू शकतो.करण हे पीक जमिनीतील खूप जास्तप्रमाणात अन्नद्रव्ये हे खाऊन टाकतात.त्या मुळे जमीन ही उत्पन्न क्षमतेला कमी पडते.

3. कापशी लागवड साठी आपण कोणत्या जमिनीची निवड करतो यावर देखील हे अवलंबून असते की पिकावर किती प्रमाणात रोगाचा प्रदूर भाव होतो त्यासाठी कापशी लागवड करण्यासाठी हलकी किंवा मुरमाड जमीन निवडणे टाळावे.

कपाशी वरील लाल्या रोगाचे अन्य कारणे

1. जेव्हा कपाशीची बोंडावस्था असते,तेव्हा कपाशीच्या पिकाला जास्त प्रमाणात नत्राची गरज असते.नेमक्या याच वेळी जर नत्राचे प्रमाण कमी झाले तर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होते.

2.पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यामुळे जमिनीत जास्त पाणी साचून राहिले व अशा पाण्याचा निचरा व्यवस्थित आणि पटकन झाला नाही तर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि कपाशीची पाने लाल होतात.

हे पण पहा --  Last cotton spray: कपाशीवर शेवटची फवारणी केव्हा आणि कोणती करावी?

3.रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला म्हणजे तुडतुडे किडी चा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास कपाशीचे पान सुरुवातीला कडेने लाल पडून नंतर संपूर्ण पान लालसर दिसते.

4. बीटी जनुक असलेल्या कपाशीच्या जाती मध्ये बोंड आळीला प्रतिबंध करण्याचा गुणधर्म असल्यामुळे झाडावर जास्त बोंडे टिकून राहतात व साहजिकच जास्त बोडांना जास्त नत्राची गरज भासते.अशा वेळी जमिनीतून लागणाऱ्या आवश्यक त्या नत्राचा पुरवठा न झाल्याने बोंडाना लागणाऱ्या नत्राची गरज ही कपाशीच्या पानाच्या माध्यमातून भागविली जाते.त्यामुळे पानांमध्ये नत्राचे प्रमाण कमी होऊन कपाशीचे पाने लाल पडू लागतात.

5.पावसामुळे पाण्याचा ताण पडला तर त्याचा परिणाम जमिनीतील नत्र, मॅग्नेशियम सारखी आवश्यक मुलद्रवे कपाशीच्या झाडाला हव्या त्या प्रमाणात शोषता येऊ शकत नाही. हेदेखील एक महत्त्वाचे कारण या रोगामध्ये आहे.

कपाशीवरील लाल्या रोगावर नियंत्रण कसे करावे ?

रासायनिक खते व्यवस्थापन

• कपाशीच्या निरनिराळ्या अवस्था जसे की बोंडे भरणे,पाते लागणे यासारख्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये दोन ते तीन वेळेस दोन टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी करावी.

• एवढ्या प्रमाणात काळजी घेतल्यानंतर घेतल्यावर जर लाल्या रोगाची लक्षणे कपाशीवर दिसून लागल्यात. चाळीस ग्रॅम मॅग्नेशियम परफेक्ट प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून शिफारसीनुसार दोन ते तीन फवारण्या कराव्यात. अथवा जमिनीतून 20 ते 30 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रती फॅक्टरी द्यावे.

• कपाशीवर मावा तुडतुडे फुलकिडे यासारख्या रस शोषक कीटकांचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी फी क्रोनील 20 मिली किंवा दहा मिली इमिडाक्लोप्रिड किंवा 20 मिली किंवा 10 मिली इमिडा क्लोप्रिड किंवा 20 मिली बुप्रोफेझिन 25 एस सी प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कापशी वरील लाल्या रोगाचे नियंत्रण कसे करावे?

>> कापशी लागवड करताना अतिशय हलकी जमीन निवडणे टाळावे

>> ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा चागल्या प्रमाणात होतो अश्या ठिकाणी लागवड करावी

>> कापशी पिकाला त्याच्या योग्य वेळी खताची योग्य मात्र ही द्यावी

>> कोरडवाहू क्षेत्रासाठी नत्राची मात्रा ही 2 वेळा विभागून द्यावी.

1 thought on “Lalya Disease On Cotton : कपाशीवरील लाल्या रोग कारणे आणि उपाय”

Leave a Comment