Close Visit Mhshetkari

Kusum yojana : खुशखबर..नवीन 2 लाख सोलर पंप बसणार! ‘या’ शेतकऱ्यांचा सामावेश,पहा यादी

Kusum yojana : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून पुन्हा एकदा दिलासा देणारा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे.अंतर्गत हा नवीन GR निर्गमित केलेला आहे.नवीन अकर जिल्ह्यातील शेतकरी बांधव अर्ज दाखल करु शकणार आहे.

Kusum Solar Pump Scheme 

राज्यातील कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांर्तगत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय,नवी दिल्ली यांचेकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान (कुसुम) देशभरात राबविण्यात येत आहे.

या अभियानाच्या घटक ब (Componant B) अंतर्गत एकूण 1 लाख पारेषण विरहीत सौर कृषीपंप मंजूर केले असून त्याची अंमलबजावणी महाऊर्जाद्वारे करण्यात येत आहे.

कुसुम सोलर योजना महाराष्ट्र

विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना दिवसात आठ तास सिंचन करता यावे यासाठी महाराष्ट्राला 2 लाख कृषी पंप उद्दिष्ट केंद्र सरकारचे कुसुम योजना अंतर्गत देण्यात येत आहे.(Kusum Solar Pump Scheme 2022) यासाठी राज्यात सध्या 20 जिल्ह्यांमध्ये अर्ज नोंदणी देखील सुरू झालेले आहे. कोणत्या जिल्ह्यात शेतकरी पात्र असणार आहेत. 

Kusum yojana Maharashtra

सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकरीता राज्य शासनाच्या अर्थसंकल्पिय अनुदानातून १० टक्के हिस्सा देण्यात आला आहे.10 % लाभार्थी हिस्सा 30% टक्के केंद्र शासनाचे परस्पर प्राप्त होणारे अर्थसहाय्य व उर्वरित 30% महावितरण कडील एस्क्रो खात्यात वाढीव वीज विक्रीवरील करामधून परस्पर जमा होणाऱ्या रक्कमेतून शासन मान्यतेनुसार अदा करण्यात येणार आहे.

हे पण पहा --  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कुसुम सोलर पंप योजना नवीन अर्ज सुरू || kusum solar pump online apply

शासन निर्णयानुसार आस्थापित होणाऱ्या सौर कृषीपंपाच्या (Kusum yojana Maharashtra) सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याचा राज्य शासनाच्या अनुदानाचा 10 % हिस्सा उपलब्ध करुन द्यावयाचा आहे.

पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजना

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता “मागणी क्रमांक, के-६, मुख्य लेखाशीर्ष- २८१०- “पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजना” याखाली अर्थसंकल्पित रु. १०९.११ कोटी मधून रु.३८.१८८५ कोटी निधी वितरीत केला आहे.

 आता प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंग उत्थान महाभियान (कुसुम) या अभियानाच्या घटक ब (Componant B) अंतर्गत, आस्थापित होणाऱ्या पारेषण विरहीत सौर कृषीपंपातील 10% शासन हिस्सा देण्यासाठी वित्त विभागाच्या सूचनानुसार अर्थसंकल्पित निधीच्या 14 टक्केच्या व विभागाकडे उपलब्ध असलेल्या निधीच्या मर्यादेत रु. 15.27 कोटी महाऊर्जाला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment