Kusum yojana : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.कुसुम सोलर योजने अंतर्गत महा ऊर्जाला सर्वसाधारण गटाच्या सौर कृषी पंपाच्या लाभार्थ्यांना शासन अनुदान मिळणार आहे. 2022-23 करीतही वितरित करण्यात याबाबतचा जीआर 30 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
Pm Kusum Yojana Maharashtra
कुसुम योजनेच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या दि.१० फेब्रुवारी,२०२२ रोजीच्या बैठकीमध्ये वित्तवर्ष २०२२-२३ मध्ये कुसुम टप्पा-२ अंतर्गत ५०,००० नग सौर कृषिपंप आस्थापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार दि. १३ एप्रिल २०२२ रोजी १४ पुरवठादारांना कार्यादेश निर्गमित करण्यात आले असून अंमलबजावणी वेगाने सुरु आहे.
राज्यातील अंतर्गत कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांर्तगत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय,नवी दिल्ली यांचेकडून शेतकन्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान (कुसुम) देशभरात राबविण्यात येत आहे.
या अभियानाच्या घटक ब(Componant B)अंतर्गत एकूण १,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपंप मंजूर केले असून त्याची अंमलबजावणी महाऊर्जाद्वारे करण्यात येत आहे.
पीएम कुसुम सोलर योजना
पीएम कुसुम सोलर योजना टप्पा-२ अंतर्गत ३०५२७ लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा भरलेला असून त्यामधील आस्थापित १००६५ पंपापैकी सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्यासाठी ८९१८ पंप,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील लाभार्थ्यांसाठी ६९६ पंप व आदिवासी विकास विभागाकडील लाभार्थ्यासाठी ४५१ पंप आस्थापित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ८४११ स्थळाच्या ठिकाणी पुरवठादारानी साहित्याचा पुरवठा केला असून सदर पंप आस्थापित करण्यात येत आहेत.
PM Kusum Solar Pump Yojana
सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकरीता राज्य शासनाच्या अर्थसंकल्पिय अनुदानातून १० टक्के हिस्सा देण्यात येणार असून १० टक्के लाभार्थी हिस्सा ३० टक्के केंद्र शासनाचे परस्पर प्राप्त होणारे अर्थसहाय्य व उर्वरित ३० टक्के महावितरण कडील एस्को खात्यात वाढीव वीज विक्रीवरील करामधून परस्पर जमा होणाऱ्या रक्कमेतून शासन मान्यतेनुसार अदा करण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार आस्थापित होणाऱ्या सौर कृषीपंपाच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांचा राज्य शासनाच्या अनुदानाचा १० टक्के हिस्सा उपलब्ध करून देण्यात आला आहे.