Close Visit Mhshetkari

पोळा आमवस्या कापूस कोणती फवारणी करावी ? Kapus favarni

Kapus favarni : पोळा अमावस्येच्या वेळीची ही कपाशी फवारणी अतिशय महत्त्वाची असते.या फवारणी मध्ये नेमके कोणते कीटकनाशक कोणते बुरशीनाशक कोणते टॉनिक वापरणे गरजेचे आहे ? तर या संदर्भात सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Kapus Favarni
Kapus Favarni

Pola Amavasya Kapus Favarni

  अमावस्येच्या रात्रीच्या दोन दिवस अगोदर व दोन दिवस नंतर गुलाबी बोंडअळीचे पतंग कपाशीवर मोठ्या प्रमाणात अंडी घालतात. त्याचा परिणाम ५-६ दिवसांनी कापूस पिकावर दिसून येतो. यावेळी फुलाची डोमकळी म्हणजे (न उमललेली कळी) दिसू लागत असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने स्पष्ट केले.

कपाशीवर पोळा अमावस्या फवारणी

आपण ह्या बोंडअळीला मारू शकत नाही हिच्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर आमवेश्येच्या आदल्या दिवशी फवारणी करणे किंवा ती अति सूक्ष्म अवस्थेत पण कैरीच्या आत जाण्याच्या अगोदरच अळी नाशक फवारा मारणे आवश्यक असते.

बोंडअळी अंडी घालण्याआधी तीन दिवसांपर्यंत पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडीरेक्टीन ०.१५ टक्के प्रवाही (एनएसकेई बेस) २५ मि.ली. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा स्प्रेडर 5/7 मिली फवारणी करावी.वातावरणात पुरेशी आर्द्रता असल्याने बिव्हेरिया बॅसियाना ४० मि. ली. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हे पण पहा --  Last cotton spray : कपाशीवर महत्वाची आणि शेवटची फवारणी कोणती करावी?

Leave a Comment