Close Visit Mhshetkari

कापूस पिकातील बोंडेसड व त्याचे योग्य व्यवस्थापन Kapashi bondesad

Kapashi bondesad : कपाशीवरील कीड आणि रोगांचा विचार केला तर कपाशीमध्ये बोंड आळी आणि कपाशीची बोंडे सडणे हे दोन प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे नुकसान जास्त होते.बोंड सडी मध्ये बऱ्याचदा कपाशीची बोंडे बाहेरून निरोगी दिसतात परंतू मधून ती जर फोडून बघितली तर आतून ती गुलाबी आणि पिवळसर लाल रंगाचेहोऊन सडलेली दिसतात.

kapashi bondsad
kapashi bondsad

कपाशी बोंडसड

कपाशी वरील बोंडसड होण्याची समस्या बऱ्याच भागामध्ये दिसून येत आहे. त्यामध्ये बहुतेक बोंडे बाह्य भागावरून निरोगी दिसतात. तर काही बोंडांवर रस शोषणाऱ्या किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावाची लक्षणे असतात.साधारणतः बोंडातील एक ते दोन कप्पे तर काही ठिकाणी संपूर्ण बोंड सडल्याचे आढळते.

पावसाळ्यात होणारा संततधार व रिमझिम पाऊस, सतत ढगाळ हवामान, हवेतील अधिक आर्द्रता इ. घटकांमुळे आंतरिक बोंड सडण रोगाची समस्या आढळते. ‘कपाशीचे बोंड सडण्याचे कारणे’ सांगायचे तर हा रोग प्रामुख्याने कमी प्राणवायू अवस्थेत तग धरणाऱ्या रोगकारक जिवाणू आणि काही प्रमाणात आंतर्वनस्पतीय रोगकारक बुरशीमुळे होतो.

कपाशीचे बोंड सडण्याचे दोन प्रकार

1) आंतरिक बोंड सडणे –

कपाशीवरील बोंडेसड ही समस्या प्रामुख्याने कमी प्राणवायू अवस्थेत जिवंतकापूस पिकातील बोंडे सड व त्याचे योग्य व्यवस्थापन! राहणारे व तग धरणारे रोगकारक जिवाणू आणि काही प्रमाणात आंतर वनस्पती रोगकारक बुरशी यांच्या संसर्गामुळे होते.या प्रकारात कपाशीची बोंडे बाहेरून निरोगी दिसतात परंतु फोडली असता मधील कापूस पिवळसर गुलाबी ते लाल तपकिरी रंगाचा होऊन सडलेला दिसतो. तसेच बोंडावर पाकळ्या चिकटल्याने  बोंडा च्या बाहेरील भागावर ओलसरपणा राहतो अशा ठिकाणी जिवाणूजन्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.

हे पण पहा --  Cotton crop : पाकिस्तान,बांग्लादेश भारतातून कापूस आयात करणार! दसऱ्याला मिळाला एवढा भाव

2) बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा संसर्ग –

 यामध्ये काही रोगकारक बुरशीं, कुजलेल्या अवशेषांवर जगणारे सूक्ष्मजीव तसेच काही प्रमाणात बोडांवरील जिवाणू करपा कारणीभूत असतो. त्यामध्ये बोंडे परिपक्व आणि उमलण्याच्या अवस्थेत असे प्रकार आढळून येतात.बहुतेक वेळा बोन्डावर बुरशीची वाढ झाल्याचे दिसते.

कपाशी बोंडसड उपाय योजना

बोंडांना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात.त्याठिकाणी ओलसरपणा राहून रोगकारक तसेच इतर नुकसानदायक बुरशीचीवाढ होणार नाही.कपाशी पात्या,फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रसशोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवून वेळीच उपाय योजना कराव्यात.

पात्याफुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततच्या ढगाळ वातावरण,हवेतील आद्रता व रिमझिम पाऊस दीर्घकाळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडरोगाच्या व्यवस्थापनासाठी,बोंडांच्या पृष्ठ भागावर होणारा बुरशींचा संसर्ग रोखण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एक बुरशीनाशकाची फवारणी करावी.(कपाशी बोंडसड उपाय योजना )

1) इंट्राकॉल (Antracol) – 30 ml 15 लीटर पाणी

2) बाविस्टीन (Bavistin) 

3) साफ (Saff) 

4) बायोविटा (Biovita)

Leave a Comment