Close Visit Mhshetkari

Indian currency : नोटावरील फोटोचे राजकारण सुरू पण,भारतीय चलनाचा इतिहास तुम्हाला माहीती आहे का?

Indian Currency : चलनी नोटांवर आज जे महात्मा गांधींचे चित्र दिसतेय ते काही स्वातंत्र्यापासून नाही.या आधी चलनी नोटांमध्ये अनेक वेळा बदल करण्यात आले होते.भारतीय चलनी नोटांच्या चित्राचा बदल आणि इतिहास काय आहे? याची सविस्तर माहिती या लेखात पाहूया.

Indian Rupee

पुन्हा एकदा चलनी नोटांवरील Indian Rupee गांधींची प्रतिमा चर्चेत आली.या आधी अनेकांनी चलनी नोटांवर असलेल्या महात्मा गांधींच्या चित्रावर आक्षेप घेतलेला आहे.सध्या शिवाजी महाराजांपासून ते सुभाषचंद्र बोस आणि इतर महापुरुषांच्या नावाचीही शिफारस करण्यात येत आहे.नोटांवर इतर चित्रे लावल्यास त्यावर कोणी आक्षेप घेऊ शकतो,त्यानंतर अनेक मागण्या पुढे येऊ शकतात ही गोष्ट लक्षात घेता केंद्र सरकार आणि आरबीआयने आतापर्यंत तरी त्यामध्ये काही बदल केला नाही.Indian Rupee

भारतीय चलनी नोटांचा इतिहास

स्वातंत्र्यापूर्वी भारतीय चलनाचे व्यवस्थापन हे ब्रिटिशांच्या हाती होते हिल्टन यंग कमिटीच्या शिफारशीवरून 1935 साली स्थापन झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून हे व्यवस्थापन करण्यात येत होते.त्यावेळी ब्रिटनच्या किंग जॉर्जचा फोटो भारतीय नोटांवर छापण्यात येत असे.स्वातंत्र्यानंतर भारतीय चलनाचे व्यवस्थापन हे भारत सरकारच्या हाती आले आणि मग भारत सरकारने, 1949 साली सर्वप्रथम एक रुपयाची नवीन नोट चलनात आणली.

Indian Money 2023

सुरुवातीच्या काळात नोटांवर केवळ इंग्रजीचा भाषेचा वापर करण्यात येत असे पण 1954 साली पहिल्यांदा या नोटांवर हिंदी भाषेत सौ रुपया,एक हजार रुपया अशा शब्दांची छपाई करण्यात आली.

महात्मा गांधींचे चित्र 1987 साली 500 रुपयांच्या नोटेवर ऑक्टोबर 1987 साली 500 रुपयांच्या नोटेवर पहिल्यांदा महात्मा गांधींच्या चित्राची छपाई करण्यात आली.तर सारनाथचा अशोक स्तंभ हा वॉटर मार्क कायम राहिला.

Mahatma Gandhi’s picture on indian currency

सध्या आपल्या नोटांवर जे महात्मा गांधींचं चित्र दिसते ते चित्र पहिल्यांदा 1996 साली छापण्यात आले होते.नोटांवर दिसणारा गांधीजींचा फोटो हा तत्कालिन भारतातील ब्रिटीश सेक्रेटरी लॉर्ड फ्रेडरिक पॅथिक लॉरेंन्स यांच्यासोबत 1946 मध्ये झालेल्या भेटीदरम्यानचा असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment