Close Visit Mhshetkari

Income tax on NPS : राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत NPS व PF धारकांना दिलासा! मिळणार असा सवलत

IIncome tax on NPS : राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) धारक कर्मचाऱ्यांना नवीन आर्थिक वर्षांमध्ये मोठी आयकर सवलत देण्याची तरतुद नवीन आर्थिक धोरणांमध्ये करण्यात आलेली असून मध्ये गुंतवणुक करणाऱ्या खाजगी कॉर्पोरट कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे.पाहुया सविस्तर माहिती.

NPS धारकांना मिळाली कर सवलत

NPS वर एकाच वेळी तीन प्रकारचे कर लाभ मिळू शकतो. आयकर कलम 80CCD (1), 80CCD (2) आणि कलम 80CCD (1b) अंतर्गत कर वाचवता येतो.NPS सदस्य असलेली कोणतीही व्यक्ती आयकर कायद्याच्या कलम 80CCE अंतर्गत रु. 1.5 लाखांपर्यंत वजावट मिळवू शकते.कलम 80 CCD(1) अंतर्गत एकूण उत्पन्नाच्या 10 टक्क्यांवर कर कपातीचा दावा कमाल मर्यादेत करू शकतो.

आयकर कायदा 80 CCD (1B) अंतर्गत सर्व NPS सदस्यांसाठी विशेष कर लाभ मिळतो. NPS (टियर I) मध्ये रु. 50,000, अतिरिक्त कपातीचा लाभ आयकर कायद्याच्या कलम 80 CCD(1B) अंतर्गत NPS सदस्यांना उपलब्ध आहे. हे आयकर कायद्याच्या कलम 1861 अंतर्गत उपलब्ध असलेल्या रु.1.5 लाखाच्या कपातीव्यतिरिक्त आहे.

आयकर कायदा 80 CCD कर सवलत

NPS मध्ये कलम 80 सीसीडी अंतर्गत कर वजावटीची तरतुद करण्यात आलेली आहे.दोन रुपयांच्या मर्यादा पेक्षा अधिक रक्कमेचा योगदान कर्त्यांनी दिलेली योगदान रक्कम आयकर कायदा 1961 च्या कलम 80 CCD अंतर्गत सवलतीस पात्र ठरते.NPS अंतर्गत कर लाभ मिळविण्यासाठी गुंतवणुकीचा पुरावा म्हणून ग्राहक व्यवहाराचे विवरण सादर करू शकतो.

हे पण पहा --  Tax Department Bharti : आयकर विभागात 10 वी - 12 पास उमेदवारांसाठी मुंबईत नोकरीची संधी;

Income tax New relief for NPS

PFRDA ने अर्थ मंत्रालयाकडे एक प्रस्ताव पाठवला असून प्रस्तावात नमुद करण्यात आले आहेत कि,सरकारी,कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी तसेच व्यावसायिकांनाही NPS योगदानावरील 24 % संपुर्ण रकमेवर करसवलतीचा लाभ देण्यात येईल.सध्या NPS वरील 20 % रक्कमच करसवलतीस पात्र होती.यामध्ये वाढ करुन 24 टक्के केल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना कर सवलतीमध्ये मोठा दिलासा मिळालेला आहे.

PF खात्यावर देखील मिळणार कर सवलत

PFRDA चे अध्यक्ष सुप्रितिम बंडोपाध्याय यांच्या मते राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून देण्यात आलेले 14% योगदान करसवलतीस पात्र आहे.त्याच धर्तीवर कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील सदर लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता NPS मधील PF ची रक्कम 50 हजारांच्या स्टँडर्ड डिडक्शन म्हणुन 50 हजार रुपयांची income tax सवलत देण्याच्या संदर्भात PFRDA प्रस्तावात नमुद करण्यात आले आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment