Close Visit Mhshetkari

Income tax 2023 : खुशखबर…. सरकार इन्कम टॅक्स धारकास मिळणार मोठ्या 5 सवलती! पहा किती वाचणार टॅक्स

Income tax 2023 : केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे.अशात केंद्र सरकार पगारदार वर्गास मोठी भेट देऊ शकते.मध्यमवर्गीयांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार काही वेगळे मार्ग अवलंबला जाऊ शकतो.यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या 5 घोषणांची अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

80C मध्ये मिळणार अधिक सूट

आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत आयकर भरणारास 1 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक करसवलत मिळत असते.ही मर्यादा वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून  करत आहेत.सरकारने या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतल्यास करदात्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

स्टैंडर्ड डिडक्शनमध्ये बदल होणार!

स्टँडर्ड डिडक्शन अंतर्गत पगारदार वर्गाला दरवर्षी 50,000 रुपयांची सूट मिळत असते.असे मानले जाते आहे की केंद्र सरकार आयकराच्या कलम 16 (IA) मध्ये बदल करू शकते, त्यामुळे स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजारांवरून 75 हजार रुपये होऊ शकते.

Health Insurance

सध्या हेल्थ इन्शुरन्स क्लेम अंतर्गत 25,000 रुपयांची सूट मिळत आहे.अर्थसंकल्प 2023 मध्ये सरकार ती मर्यादा वाढवून 50 हजार रुपये व वयोवृद्धांसाठी 75 हजार रुपयांपर्यंत वाढवली जाईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे पण पहा --  Union Budget 2023 : खुशखबर..सरकारी कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पात मिळणार मोठे गिफ्ट!

Tax on NPS and GPF

पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करतात.अशावेळी सरकार यात पेन्शन योजनेतील करसवलतीची मर्यादाही वाढवू शकते.आयकर कायद्याच्या कलम 80 CCD (1B)अंतर्गत सरकार ही मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते,असे तज्ज्ञांचे मत आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment